ऐश्वर्यम सोसायटीत पर्यावरण दिवस साजरा
esakal June 13, 2025 01:45 AM

पिंपरी, ता. १२ : आकुर्डी येथील ऐश्वर्यम सहकारी हाउसिंग संस्था येथे जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. या वेळी ऐश्वर्यम व्हेंटर्स सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ऐश्वर्यम सोसायटील सर्व जेष्ठ नागरिक, संचालक मंडळ आणि रहिवासी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते गणेश लंगोटे, विशाल काळभोर उपस्थित होते. ऐश्वर्यम व्हेंटर्स सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष नितीन गोळे, माजी अध्यक्ष अनिल शेटे, ऐश्वर्यम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीमती शोभा पाटील, ऐश्वर्यम संचालक मंडळातील पदाधिकारी उमेश शर्मा, मुरलीधर रेड्डी, राम गायकवाड यांनी प्रयत्नांतून हा उपक्रम यशस्वी झाला. त्यांना ऐश्वर्यम संचालक मंडळातील इतर पदाधिकारी आणि रहिवाशांनी मदत केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.