१२ जून २०२५ हा दिवस सगळ्यांसाठी मोठी दुःखाची बातमी घेऊन आला. गुजरात येथील अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताने संपूर्ण देश हादरलाय. या अपघाताची भीषणता प्रचंड होती. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टेक ऑफ करताना एअर इंडियाचं प्रवासी विमान AI171 मेघानी नगर परिसरात कोसळलं. या विमानात २४२ प्रवासी आणि १० कर्मचारी होते. यात लहान मुले आणि स्त्रियांचा देखील समावेश होता. या प्रवाशांमध्ये ५३ ब्रिटिश नागरिक देखील होते. त्यातील २ ब्रिटिश नागरिकांचा मरणापूर्वीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
एनडीटीव्हीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात दिसणारे दोन ब्रिटिश बागरिक हे अहमदाबादच्या विमातळावर बसले आहेत. ते त्यांच्या विमानाची वाट पाहत आहेत. जे एअर इंडियाचं होतं. १० तासात आपण आपल्या घरी इंग्लंडला असणार आहोत असं ते या व्हिडिओत म्हणतात. मात्र त्यांना आपला हा व्हिडिओ शेवटचा ठरेल याची पुसटशी कल्पनाही नव्हती. हे दोघेही या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेत. हे दोघे मिळून द वेलनेस फाऊंड्री नावाची कंपनी चालवत होते.
या व्हिडिओमध्ये ते भारताला गुडबाय म्हणतायत. ते एकमेकांसोबत मजामस्ती करत आहेत. ते खूप आनंदी होते. या व्हिडिओत आपण भारतातून खूप, खूप, खूप आनंदाने घरी जात असल्याचं तो म्हणतो. ते दोघे एअरपोर्टवर चहादेखील घेतात. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मात्र या अपघाताने त्यांच्या आयुष्याचा हा शेवटचा व्हिडिओ ठरलाय.