पुणे गुन्हेगारीच्या बातम्या आपण पुण्यातील संस्था संचालकांनी छेडछाड केल्यानंतर आपण खूप छान एमएनएस आक्रमक दिसत आहात
Marathi June 13, 2025 08:25 PM

पुणे: मनसेच्या विद्यार्थी सेनेकडून आज पुण्यातील बावधन परिसरात असणाऱ्या रामचंद्र इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन सूरज शर्मा याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. या संस्थेचे चेअरमन असलेल्या शर्मावर बावधन पोलिस ठाण्यात महिलेची छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. संस्थेत काम करणाऱ्या एका महिलेने शर्माच्या विरोधात तक्रार दिली होती. तक्रारदार महिला ही त्याच संस्थेत काम करत असून शर्माने तिला अनेक वेळा टोमणे मारले.

फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शर्माने त्या महिलेला “तू खूप छान दिसतेस” असे म्हणत तिचा हात पकडून तिला ओढून तिची छेड काढली. याप्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात या महिलेने तक्रार दिल्यानंतर शर्मा याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मात्र गुन्हा दाखल असून सुद्धा शर्माला अटक का केली नाही हा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून आज आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी शर्मा विरोधात घोषणाबाजी करत मराठी महिलेवर अत्याचार करणाऱ्या परप्रांतीय सूरज शर्माला अटक झालीच पाहिजे अशी मागणी आंदोलकांनी केली.

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.