भगवा कोकरे महाराजांची संस्था आदर्श ठरेल
esakal June 13, 2025 11:45 PM

लोटे परशुराम येथे
गुरुकूलाचा प्रारंभ
चिपळूण ः विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच धार्मिक व शास्त्रीय शिक्षणाची गरज आहे. आध्यात्मिक वारकरी गुरूकूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची ही शैक्षणिक गरज भागवली जाईल तसेच या वास्तूत अनाथ, निराधार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळणार असल्याने भगवान कोकरे महाराज यांची ही संस्था जिल्ह्यात आदर्शवत ठरेल, असा विश्वास पुरूषोत्तम मोरे महाराज यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला. येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्ती धामसेवा संस्थानतर्फे लोटे परशुराम येथे आध्यात्मिक वारकरी गुरूकूलचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी माणिक महाराज मोरे, संतोष शास्त्री आनंद, संदीप लोहर, नामदेव हरड, निकम शास्त्री, अभय सहस्रबुद्धे, दत्ता आयरे, रूपेश राजेशिर्के, राजेंद्र राजेशिर्के, किशोर चौगुले आदी उपस्थित होते. श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्ती धाम सेवा संस्थानतर्फे लोटे येथे गोशाळा चालवली जाते. संस्थेच्या माध्यमातून आध्यात्मिक वारकरी गुरूकूल सुरू करण्यात आली. विद्यार्थ्यांना मोफत शालेय शिक्षण मिळण्याची व्यवस्थादेखील कोकरे यांनी केली आहे. आध्यामिक गुरूकुल संघाचे कोषाध्यक्ष सोपान निकम म्हणाले, कोकरे महाराज यांनी गायींची सेवा करतानाच गुरूकल स्थापन करून मोठे आव्हान स्वीकारले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.