मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रा. लि. आणि महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागात नागपूरमध्ये हेलिकॉप्टर उत्पादन कारखाना उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.
श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टचा वादग्रस्त निर्णय?अहिल्या नगर जिल्ह्यातील नेवाशातील शनिशिंगणापूर इथल्या श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टने 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांसह 167 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करताना, त्यांचा धर्म हा मुद्दा न करता कामात अनियमितता असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान सकल हिंदू समाजाच्या वतीने श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्ट कडे 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची मागणी केली होती. त्यासाठी मोर्चाचा इशाराही देण्यात आला होता. मोर्चा येण्यापूर्वीच श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टने कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
अहमदाबाद विमान अपघाताबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिकाअहमदाबाद एअर इंडिया अपघाताबाबत सर्वोच्च न्यायालयात पत्र याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये सरन्यायाधीशांना स्वतःहून दखल घेण्यास सांगण्यात आले आहे. ही याचिका दोन डॉक्टरांनी पाठवली आहे. यासोबतच एअर इंडिया विमान अपघातातील पीडितांना भरपाई देण्याचे निर्देश केंद्र सरकारला देण्याची मागणी करण्यात आली आहे. डॉ. सौरव कुमार आणि डॉ. ध्रुव चौहान यांनी वकील सत्यम सिंह राजपूत यांच्यामार्फत पत्र याचिका दिली आहे.
ब्लॅक बॉक्स सापडलाअहमदाबादेतील भीषण विमान दुर्घटनेनंतर आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स अखेर सापडला आहे. बीजे मेडिकल कॉलेजच्या छतावर हा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. त्यामुळे आता महत्त्वपूर्ण माहिती समोर येणार आहे.