माजी नगरसेविकेच्या मुलीसोबत तरूणाची बाचाबाची; समर्थकांचा तरूणावर तलवारीने हल्ला, घरावर दगडफेक,
Marathi June 14, 2025 11:24 AM

<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;">अंबरनाथ : अंबरनाथ बारकूपाडा परिसरात जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणाला माजी नगरसेविकेच्या मुलीने हॉर्न (Crime News) वाजवत हटकलं. संतापलेल्या तरुणाची आणि माजी नगरसेविकाच्या मुलीची यावेळी बाचाबाची झाली. यावेळी माजी नगरसेविकेच्या समर्थकांनी त्या तरुणावर तलवारीने हल्ला केला. तरुणावर वार करणाऱ्या नगरसेविकेच्या समर्थकांना देखील जमावाने (Crime News) चोप दिला. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती. 

अंबरनाथमध्ये किरकोळ वादातून दोन गट आपापसात भिडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. गाडी चालवताना मधे आलेल्या तरुणाला हटकल्याने त्याने संतापून माजी नगरसेविकेच्या मुलीला शिवीगाळ केली, त्यामुळे माजी नगरसेविकेच्या समर्थंकानी शिवीगाळ (Crime News) करणाऱ्या तरुणावर तलवारीने वार केले. त्यानंतर संतापलेल्या परिसरातील नागरिकांनी तरुणाला चोप देत माजी नगरसेविकेच्या घरावर दगडफेक केली. अंबरनाथच्या बारकूपाडा परिसरात ही घटना घडली. या घटनेत जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Crime News)

<एच 2 शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;">नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथच्या बारकूपाडा परिसरात ही घटना घडली असून या घटनेनंतर परिसरातील परिस्थिती काहीशी तणावपूर्ण बनली होती. अंबरनाथच्या बारकूपाडा परिसरात राहणाऱ्या माजी नगरसेविकेची मुलगी काल(शुक्रवारी,ता13) सायंकाळी घरी येत असताना एक तरुण रस्त्यावर आडवा चालत जात होता. त्यामुळे नगरसेविकेच्या मुलीने या तरुणाला बाजूला होण्यासाठी तीन वेळा गाडीचा हॉर्न वाजवला. मात्र हा तरुण बाजूला न झाल्यामुळे तिने त्या तरूणाला हटकले, यावेळी त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद होऊन या तरुणाने शिवीगाळ केली असा आरोप  नगरसेविकेच्या मुलीने केला आहे. तर दुसरीकडे या तरुणाने नगरसेविकेच्या मुलीने आपल्याला शिवीगाळ केली असा आरोप केला आहे. ही बाब समजताच  नगरसेविकेच्या समर्थक असलेल्या दोन तरुणांनी शिवीगाळ करणाऱ्या तरुणावर धारदार शस्त्राने वार केले. मात्र हे तरुण वार करून तिथून पळून जात असतानाच परिसरातील लोकांनी त्यांना घेराव घालत चोप दिला. तसेच त्यांचा पाठलाग करत थेट नगरसेविकेच्या घरावर दगडफेक केली. या सगळ्या प्रकरणानंतर फासेपारधी समाजातील जखमी तरुणाला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर शिवाजीनगर पोलिसांनी बारकू पाडा परिसरात धाव घेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.

& nbsp;

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.