Maharashtra Breaking Updates: अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर डीजीसीएने मोठा निर्णय घेतला आहे. बोईंगच्या 787 विमानांच्या सुरक्षा तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच डीएनए चाचणीनंतर मृतदेह नातेवईकांना सोपवण्यास सुरूवात केली आहे. अनेक मृतदेह पूर्णपणे जळाल्यानं ओळख पटवण्यात अडचणी येत असून आतापर्यंत 8 मृतदेह सोपवल्याची माहिती समोर आली आहे. इराण आणि इस्रायलच्या युद्धानं एक वेगळं वळण घेतलं आहे. इराणने इस्रायलवर (Iran Attack On Israel) मोठा हल्ला मोठा हल्ला केला आहे. शुक्रवारी (13 जून 2025) रात्री उशिरा इराणने इस्रायलवर शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागून मोठा प्रत्युत्तरात्मक हल्ला केला. महाराष्ट्रात देखील विविध भागात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. या घडामोडींसह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर….