नवरा असावा तर असा! वरातीत नवरेदवाने नवरीला उचललं खांद्यावर; अन् पुढे काय घडलं ते एकदा पाहाच
Saam TV June 14, 2025 02:45 PM

bride groom video: विवाह म्हणजे फक्त दोन जीवांचा एकत्र येणं नाही, तर दोन कुटुंबं, दोन संस्कृती आणि दोन हृदयांचं मिलन असतं. सध्या सोशल मीडियावर एक असाच खास लग्नाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, ज्यामध्ये नवऱ्यानं आपल्या नवरीसाठी काहीसं हटके केलं आणि तो क्षण सगळ्यांच्या मनात घर करून गेला.

हा (Viral) व्हिडिओ पाहिल्यावर ''जेव्हा नवरीला मनासारखा जोडीदार भेटतो, तेव्हा चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो'' हे खरं वाटायला लागतं. व्हायरल व्हिडिओमध्ये वरातीत एकदम धम्माल वातावरण आहे. डीजेच्या तालावर घरातील सर्वजण नाचत आहेत आणि त्या गर्दीत नवरा आणि नवरी दोघंही मजेत सहभागी झाले आहेत. पण त्यातच अचानक नवऱ्यानं जे केलं, ते बघून सगळे आश्चर्यचकित झाले.

वरातीत सगळ्यांपुढे नवऱ्यानं अचानक नवरीला उचलून घेतलं आणि तिचं मन अगदी जिंकलं. ही कृती अतिशय प्रेमळ होती आणि नवरीच्या चेहऱ्यावरचा आनंद त्या क्षणी स्पष्ट दिसत होता. नवरी एकदम गोंधळूनही गेली आणि खूप लाजली, पण तिच्या डोळ्यांमधून झळकणारा आनंद संपूर्ण दृश्यात उठून दिसत होता.

हा व्हिडिओ केवळ एक प्रेमळ क्षणच नव्हता, तर आजच्या जोडप्यांच्या नात्याचा सुंदर नमुना होता. तो क्षण नवऱ्याच्या आणि नवरीच्या नात्याला अजून घट्ट करणारा ठरला. नवरीचा डान्स (Video) इन्स्टाग्रामवरील marathi_weddingz या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. काही महिन्यापूर्वी अपलोड केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि मोठ्या संख्येने व्ह्यूज मिळालेले आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.