Latest Live News Update: रायगडमध्ये मुसळधार पावसाने रस्त्यावरील मोरी गेली वाहून
esakal June 15, 2025 04:45 PM
Raigad Live: रायगडमध्ये मुसळधार पावसाने रस्त्यावरील मोरी गेली वाहून

रोहा तालुक्यातील गारभट गावाजवळ रात्रीच्या सुमारास एक दुर्घटना घडली. कोलाडजवळील पुगाव येथून पाली-नांदगावकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्याचा काही भाग मोरीसह पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला. आज सकाळी याच ठिकाणी एक टेम्पो अडकला होता; मात्र सुदैवाने टेम्पोचालकास काहीही इजा झाली नाही. सध्या या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून खालचे गारभट, हांडेवाडी आणि खरबाची वाडी या गावांचा रस्त्याने होणारा संपर्क तुटला आहे.

Pune Live Update: पुण्यात शनिवार वाड्यासमोर घंटानाद आंदोलन

स्तानिक नागरिकांना प्रशासनाला सवाल विचारला आहे.

Nashik : नाशिकमध्ये अतिक्रमण विरोधी मोहिम सुरू, पोलीस बंदोबस्त तैनात

मंत्री छगन भुजबळ यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर दुसऱ्या दिवशीच अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू करण्यात आलीय. महापालिका आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरू केली असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. नाशिक शहराचा मुख्य चौक असलेल्या द्वारका सर्कल परिसरात अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू आहे.

Kalyan : स्मार्ट मीटर लावण्याच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक

स्मार्ट मीटर लावण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाणीची घटना घडली होती. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याकडूनच ही मारहाण झाली होती. यानंतर आता रहिवाशांसह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी स्मार्ट मीटर विरोधात तीव्र आंदोलन सुरू केलं आहे. कल्याण पश्चिम गौरीपाडा परिसरात ही घटना घडली होती.

Virar : रात्रीपासून पावसाचा जोर कायम, शहरात सखल भागात साचलं पाणी

वसई-विरार शहरात रात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे. यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलं आहे. आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून शहरा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.

Yawatmal Live : केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत यवतमाळ जिल्ह्यातील जयस्वाल कुटूंब मृत्युमुखी

केदारनाथ येथील हेलिकॉप्टर दुर्घटने यवमाळ जिल्ह्यातील वणी येथील जयस्वाल कुटूंबांतील तीन सदस्य मृत्यूमुखी पडले असून यात पायलटसह 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

Mumbai- Ahmedabad Highway Live : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

रविवारी सकाळी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Pune Live : रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट

राज्यात पावसाचा जोर वाढला असून आज रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर उर्वरित महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांची संघ-भाजप समन्वय बैठकीत हजेरी

राज्यातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या समन्वय बैठकीला उपस्थित राहिले आहेत. यापूर्वीही अशा स्वरूपाची बैठक विधानसभा निवडणुकीपूर्वी पार पडली होती, ज्यात फडणवीसांनी सक्रिय सहभाग घेतला होता. आजच्या बैठकीला विशेष महत्त्व आहे, कारण या बैठकीत निवडणूक पूर्व रणनिती, उमेदवार निवड प्रक्रिया आणि मतदारांपर्यंत प्रभावी पोहोच या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. संघ आणि भाजपमधील समन्वय अधिक बळकट करण्यासाठी ही बैठक निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या पाचोडमध्ये पीव्हीसी पाईप गोडाऊनला भीषण आग

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड येथे मध्यरात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास एका पीव्हीसी पाईपच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत सुमारे ५० ते ६० लाखांचे पीव्हीसी पाईप जळून खाक झाले असून, गोदाम मालक गोविंद चावरे यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सकाळपर्यंत सुरू होते. दरम्यान, पाचोड पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Nagpur Live: नागपुरात संघ परिवाराची महत्त्वपूर्ण समन्वय बैठक आज पार पडणार

नागपूरच्या रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिरात आज संघ परिवाराची वार्षिक समन्वय बैठक पार पडणार आहे. या बैठकीस विदर्भातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या ३२ विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यंदाच्या बैठकीस विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले असून, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, तसेच दीपक तामशेट्टीवर, राम हरकारे, अतुल मोघे यांच्यासह अनेक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी यामध्ये सहभागी होणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे राजकीय व सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मागील वर्षीच्या कामाचा आढावा आणि पुढील वर्षासाठीचे नियोजन या बैठकीत केले जाणार आहे. मात्र यंदा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती पाहता, ही बैठक स्थानिक निवडणुकांसाठी दिशा ठरवणारी ठरू शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

Nagpur Live: नागपूरच्या महाल परिसरातील गांधी गेटजवळ भीषण आग; दोघांचा मृत्यू, लाखोंचं नुकसान

नागपूरच्या महाल परिसरात गांधी गेट येथील राजकमल कॉम्प्लेक्समध्ये रात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत गिरीष खत्री आणि विठ्ठल धोंडे या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुणवंत नागपूरकर आणि ऐश्वर्या त्रिवेदी हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीमुळे परिसरात प्रचंड घबराट आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत फॅन्सी फटाके, सिरीज हॅलोजन लाईट आणि विविध इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक झाले असून जवळपास दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.