Sinkhole Near Shivaji maharaj Statue Malvan : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्या वर्षी कोसळला होता. हा पुतळा आता पुन्हा उभारण्यात आला आहे. अशातच या पुतळ्याच्या बाजुची जमीन खचली आहे. याठिकाणी भगदाड पडलं आहे. यामुळे शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका निर्माण होईल का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. या ठिकाणचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जमीन खचण्याचा महाराजांच्या पुतळ्याला कोणताही धोका निर्माण झाला नसून बाजुला केवळ भगदाड पडलं आहे. या घटनेनंतर चबुतऱ्याच्या आजूबाजूचे काम निकृष्ट दर्जाचे झालंय का? अशी चर्चाही सुरु झाली आहे.