Health Care Tips : या 5 सवयी बदलतील तुमचं आयुष्य
Marathi June 16, 2025 07:25 AM

बदलती जीवनशैली फिटनेसची बऱ्यापैकी वाट लावते. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी डाएट, वर्कआउट आणि योग्य आहार अशा अनेक गोष्टी फॉलो करण्याची गरज असते. तर चला अशाच दैनंदिन आयुष्यातील 5 सवयी जाणून घेऊ, ज्या तुमचं आयुष्य बदलण्याची क्षमता ठेवतात. (Health Care Tips These 5 Healthy Habits Can Change Your Life)

1. साखर खाणे बंद करा –

असे केल्याने काही दिवसांतच रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर होऊन इन्सुलिनचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे चरबी जाळण्यास मदत होते, उर्जेची पातळी सुधारते, हृदयरोग, टाइप 2 मधुमेह आणि कर्करोगासारख्या दीर्घकालीन समस्यांचा धोका कमी होतो.

2. व्यायाम –

नियमित व्यायाम करण्याची सवय तुमच्या शरीरातील लवचिकता आणि ऊर्जा कायम ठेवते. शिवाय शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहिल्याने स्नायूंची ताकद सुधारते, सहनशक्ती वाढते आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यदेखील उत्तम राहते.

3. अतिशयोक्ती –

बऱ्याच लोकांना घडलेल्या घटनांचा खूप विचार करण्याची सवय असते. असे केल्याने मेंदूच्या नसांवर ताण येतो आणि अनेक आरोग्याविषयी समस्या वाढतात. त्यापेक्षा तुमचे विचार आणि कल्पना लिहून काढा. यामुळे मेंदूवरील ताण कमी होईल आणि रेटिक्युलर अ‍ॅक्टिव्हेटिंग सिस्टिम सक्रिय होईल.

4. वाचन –

एखाद्या पुस्तकाची किमान 10 ते 20 पाने दररोज वाचा. यामुळे तुमच्या मेंदूला चालना मिळेल आणि तुमच्या झोपेची गुणवत्तादेखील सुधारेल.

5. झोपण्यापूर्वी डिजिटल स्क्रीनचा वापर करणे –

रात्री झोपताना फोन, टीव्ही, लॅपटॉपसारख्या डिजिटल स्क्रिन्सचा वापर केल्याने अनिद्रा आणि मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे झोपण्यापूर्वी तासभर आधी अशा उपकरणांचा वापर टाळा.

हेही पाहा –

https://www.youtube.com/watch?v=GAZVK1OBOO4

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.