Maharashtra Political Live Updates : गोगावलेंनी रश्मी ठाकरे अन् लता शिंदे यांची केली तुलना...
Sarkarnama June 16, 2025 12:45 PM
Bharat Gogawale News : रश्मी ठाकरेंचा पडद्यामागून हस्तक्षेप

राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी पुन्हा एका उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. रश्मी ठाकरे पडद्यामागून हस्तक्षेप करायच्या, असा दावा गोगावले यांनी केला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी कधीही हस्तक्षेप केला नाही, असे सांगत गोगावले यांनी रश्मी ठाकरे आणि लता शिंदे यांची तुलना केली आहे. बाळासाहेब ठाकरे असताना पक्षातील निर्णय तेच घ्यायचे, असेही गोगावले म्हणाले आहेत.

Uddhav Thackeray News : शाखा प्रमुखांची बैठक

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यांनी रविवारी शाखा प्रमुखांची शिवसेना भवनात बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश दिले. तसेच आपल्या भागातील मतदारयादीतील किमान ३०० जणांशी संपर्क साधण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

Air India plane crash : रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटली

अहमदाबाद येथील विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मृत्यू झाला आहे. पण आगीमुळे अनेकांचे मृतदेहांची ओळख पटविणे कठीण झाले होते. रविवारी रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख अखेर पटली आहे. ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात आली. त्यामध्ये डीएनए मॅच झाला आहे. आता त्यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल. आतापर्यंत २१ मृतदेहांची ओळख पटली असून १२ जणांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.