Herbal Tea : हर्बल टी प्या, निरोगी राहा
Marathi June 16, 2025 05:25 PM

उन्हाच्या तीव्र उष्णतेपासून दिलासा मिळावा यामुळे सर्वचजण पावसाची आतुरतेने वाट पाहतात. पावसामुळे उष्णतेपासून दिलासा मिळत असला तरी हा ऋतू आपल्यासोबत अनेक आजार घेऊन येतो, हेही तितकंच खरं आहे. पावसाळ्यात अनेक आजार डोकं वर काढतात. त्यामुळे या दिवसात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे गरजेचे आहे, कारण रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्यास व्हायरल इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो. अशा परिस्थितीत, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही हर्बल टी प्यायल्या हवी. आज आपण जाणून घेऊयात निरोगी आरोग्यासाठी कोणत्या हर्बल टी प्यायल्या हव्यात. (List Of Herbal Tea)

पुदिना चहा (Mint Tea)

पावसाळ्यात पुदिन्याचा चहा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पुदिन्याचा चहा प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

आल्याचा चहा (Ginger Tea)

पावसाळा म्हटल्यावर चहाप्रेमींची पहिली पसंती आल्याचा चहा दिसून येतो. औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण अशी चहा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय आहे.

ग्रीन टी

वेट लॉस करण्यासाठी ग्रीन टी उपयुक्त असते. पण, तुम्ही पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ग्रीन टी प्यायला हवी. यामुळे शरीर डिटॉक्स होते.

कॅमोमाइल चहा (Chamomile Tea)

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कॅमोमाइलचा चहा तुम्ही प्यायला हवा. या चहाने तणाव दूर होतो आणि चांगली झोप लागते.

आवळा चहा (Amla Tea)

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असते.

तुळशीचा चहा (Tulsi Tea)

तुळशीमध्ये ऍटी-ऑक्सिडंट्स आणि ऍटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म असतात. हे गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असतात.

हेही पाहा –

https://www.youtube.com/watch?v=FHC2VGE3J80

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.