जळगावच्या जामनेर तालुक्यातील पहूर–खर्चाण शिवारात जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे.
शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून शेताला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतात मोठी प्रमाणावर पाणी शिरल्याने भाजीपाला वाहून गेला असून इतर पिकांचे नुकसान झाले आहे
अहमदाबादहून लंडनला जाणारी एअर इंडियाची फ्लाईट रद्दअहमदाबादहून लंडनला जाणारी एअर इंडियाची फ्लाईट रद्द करण्यात आली आहे. तांत्रिक बिघाडामुळे फ्लाईट रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे.
Kasara Live: जुन्या कसारा घाटात बर्निंग कारचा थरारजुन्या कसारा घाटात बर्निंग कारचा थरार घडला असून सुदैवाने यात चालकाला काही इजा झालेली नाही. मात्र आगीत गाडीचे नुकसान झाले आहे.
मुंबई लोकलमध्ये एक तरुण महिला डब्यात घुसून पॅंटची चैन उघडून अश्लील वर्तन केल्याचे समोर आले आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Mumbai Live : सुधाकर बडगुजर यांचा भाजपात प्रवेश, मुंबईत शक्तिप्रदर्शनसुधाकर बडगुजर यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. मुंबईत त्यांनी भव्य शक्तिप्रदर्शन करत प्रवेश केला.
Nashik Live : नाशिकमध्ये भाजप प्रवेश सोहळा! महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय फेरबदलशैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रवेश सुरू झाले असताना आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रवेशोत्सव सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपमध्ये या आठवड्यात मुंबई पक्ष कार्यालयात मोठ्या प्रमाणात अनेक पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे. कोणाला पक्षात प्रवेश दिला जातो, याकडे राजकीय तज्ज्ञांचे लक्ष लागले असून, पक्षप्रवेशामधून नाशिक शहर व जिल्ह्याच्या राजकारणात मोठे फेरबदल निश्चित मानले जात आहेत.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीच्या विजयाचा ट्रेंड राहील असे मानले जात होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीला कौल दिला.
Pune Live : एकनाथ शिंदेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; प्रमुख पदाधिकारी करणार शिवसेनेत प्रवेशएकनाथ शिंदे यांचा पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का
काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षातील अनेक प्रमुख पदाधिकारी करणार शिवसेनेत प्रवेश
मुंबईमध्ये थोड्याच वेळात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश
काँग्रेसच्या प्रदेश सचिव सोनाली मारणे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी करणार प्रवेश...
पुण्यातील प्रमोद नाना भानगिरे यांच्या माध्यमातून अनेकांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश देण्यात येत आहे
पुणे शहर आणि जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढायला सुरुवात...
Pune Live: पुण्यात पावसाला सुरुवात, पेठ भागात पावसाच्या दमदार सरीपुण्यात पावसाला सुरुवात.
सकाळपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची पुणे शहरात पुन्हा एन्ट्री.
पुण्यातील पेठ भागात पावसाच्या दमदार सरी.
सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली होती.
Kokan Live: कोकण किनारपट्टीवर आणि घाटमाथ्यावर पुढील 4 ते 5 दिवस ऑरेंज अलर्टकोकण किनारपट्टी वर आणि घाट माथ्यावर पुढील 4 ते 5 दिवस ऑरेंज अलर्ट दिला असून पर्यटकांनी अशा ठिकाणी जाणे टाळावे असा सल्ला पुणे वेधशाळेने दिला आहे.
ज्या ठिकाणी वापसा आणि ओल आहे त्या ठिकाणी शेतकरी पेरणी हाती घेऊ शकतात जर ओल कमी असेल तर शेतकऱ्याने कृषी विभागाची ज्या काही सूचना येतील त्या कडे लक्ष देणे गरजेचे आहे अशी माहिती पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी दिली आहे.
गेल्या एक आठव्यापासून मान्सून महाराष्ट्रात सक्रिय झाला आहे. बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली आहे. कोकणामध्ये पण मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे. घाट माध्यावर सुद्धा अती मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे.
आता चक्री स्थिती तयार झाली होती आता ते अरबी समुद्र आणि कोकण किनारपट्टी आणि उत्तरेकडे सरकलेले आहे गुजरात किनारपट्टी वरती कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. चक्रीय स्थिती उत्तरेकडे शिफ्ट झाल्यामुळे पावसाचा जोर कमी झालेला दिसून येते पण पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टी साठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा तिथे हलक्या किंवा मध्य पावसाची शक्यता आहे विदर्भातील काही भागात येलो अलर्ट दिला असून विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
Nashik Live: संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे मनमोहक दृश्यनाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथून निघालेली निवृत्तीनाथ महाराज पालखी अहिल्यानगर जिल्ह्यात पोहचलीय.. गेल्या काही दिवसापासून अनेक भागात मान्सूनने हजेरी लावली असून निसर्गाने देखील हिरवा शालू नेसलाय.. काही ठिकाणी काळीभोर शिवार तर काही ठिकाणी हिरवा शालू पांघरलेली जमीन असे चित्र आहे.. याच मनमोहक वातावरणातून विठू नामाचा जयघोष करत निघालेल्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे विहंगम दृश्य बघायला मिळतंय..
Kalyan Live: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी अलर्ट मोडवरपावसाळ्यात सखल भागात असलेल्या मुख्य वर्दळीच्या ठिकाणी पावसाळ्यात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी केडीएमसीने सक्शन पंप लावले आहेत. कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डोंबिवली स्टेशन सह वर्दळीची सात ते आठ ठिकाणे केडीएमसीसीने निश्चित केली आहेत . या ठिकाणी पाणी साचल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते त्याचप्रमाणे नागरिकांना मार्गक्रमण करताना तारेवरचे कसरत करावी लागते. या पार्श्वभूमीवर केडीएमसीने सात ते आठ ठिकाणी सक्षम पंप लावलेत. या ठिकाणी पाणी साचल्यास पंपच्या सहाय्याने त्या ठिकाणचे पाणी काढण्यास मदत होणार आहे.
अहमदाबादमध्ये विमान हॉस्टेलमध्ये घुसताच स्थानिक आणि विद्यार्थ्यांनी इमारतीवरून उड्या मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहेअहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर विमान हॉस्टेलमध्ये घुसताच स्थानिक आणि विद्यार्थ्यांनी इमारतीवरून उड्या मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे
एआयद्वारे अश्लील फोटो बनवून मुलींना धमक्या देणाऱ्या नराधमाला अटकएआयद्वारे अश्लील फोटो बनवून मुलींना धमक्या देणाऱ्या नराधमाला कर्नाटकातून अटक करण्यात आली आहे
Jalgaon Live: जळगावच्या जामनेर तालुक्यातील पहूर–खर्चाण शिवारात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान- जळगावच्या जामनेर तालुक्यातील पहूर–खर्चाण शिवारात जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे.
- शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने त्यांना तळ्याचं स्वरूप आलं असून, शेतकरी चिंतेत आहेत.
- अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने भाजीपाला वाहून गेला असून इतर पिकांचेही नुकसान झाले आहे.
Mumbai Live: मुंबई - गोवा महामार्गावर संगमेश्वरमध्ये दरड कोसळलीसंरक्षक भिंतीसकट दरड रस्त्यावर
संगमेश्वरमधील कसबा शास्त्रीपुलाजवळील घटना
दरड कोसळलेली एक लाईन वाहतुकीसाठी बंद
त्यामुळे या ठिकाणी होतेय वाहतूक कोंडी
संरक्षक भिंतींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
Pune Live Updates: एकाच रस्त्याचं दोनवेळा भूमिपूजन; श्रेयवादासाठी राजकीय खेळीपुण्याच्या भोर तालुक्यातील श्रीक्षेत्र बनेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचं सोमवारी पुन्हा एकदा भूमिपूजन झालं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट)चे आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. विशेष म्हणजे, या रस्त्याचं पहिलं भूमिपूजन ७ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. एकाच रस्त्याचं दोनवेळा भूमिपूजन केल्यामुळे स्थानिकांत चर्चा सुरु झाली असून, हे भूमिपूजन श्रेयवादासाठीच केलं गेल्याची जोरदार चर्चा आहे.
Air India plane crash Live Updates: मुरलीधर मोहोळ म्हणाले, एआयबीमार्फत तपास सुरू आहे. एक उच्चस्तरीय समिती देखील स्थापन करण्यात आली आहे.एअर इंडियाच्या प्रवासी विमान अपघाताबाबत नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, एआयबीमार्फत तपास सुरू आहे. एक उच्चस्तरीय समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. तिथे उपस्थित असलेल्या लोकांपेक्षा जास्त मृतदेहांचे अवयव सापडले आहेत. मृतदेहांची ओळख पटवणे खूप कठीण होत आहे, त्यामुळे डीएनए नमुने घेतले जात आहेत. डीएनए अहवाल येण्यासाठी ३६ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. काम योग्यरित्या झाले आहे याची खात्री करण्यासाठी नियमांचे पालन करावे लागेल. आतापर्यंत २८० नमुने घेण्यात आले आहेत. कालपर्यंत ७०-८० लोकांचे मृतदेह ताब्यात देण्यात आले आहेत. ब्लॅक बॉक्स सापडला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे.
Pune : पुण्यात काँग्रेसला धक्का, प्रदेश सचिव मारणे यांचा राजीनामापुण्यात काँग्रेसला आणखी एक धक्का बसला असून महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशच्या सचिव सोनाली मारणे यांनी पक्षाचा राजीनामा दिला. सोनाली मारणे आज दुपारी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत.
Nashik : बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाबाबत मध्यरात्री शहराध्यक्षांना पक्षश्रेष्ठींचा फोनसुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाची मोठी अपडेट समोर येत आहे. नाशिक भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार, ज्येष्ठ नेते विजय साने हे बडगुजर यांच्या पक्षप्रवेशासाठी मुंबईकडे रवाना झाले. रात्री उशिरा दोन वाजता उद्या मुंबई प्रदेश कार्यालयात पोहोचण्याचा शहराध्यक्ष यांना पक्ष श्रेष्ठींनी निरोप दिला अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिली.
Pune : उधार दारू न दिल्यानं दुकानाची तोडफोड, येरवडा पोलिसांनी काढली आरोपीची धिंडउधार दारू न दिल्यानं दुकानादाराला मारहाण करत दुकानाची तोडफोड करणाऱ्या आरोपीची येरवडा पोलिसांनी धिंड काढली. येरवड्यामधील एका वाईन शॉपमध्ये दुकानात दारू उधार दिली नाही म्हणून रोहित पुष्कराज पिल्ले याने मारहाण करत दुकानाची तोडफोड केली होती. या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच परिसरात त्याची धिंड काढण्यात आली.
Nashik : नाशिकमध्ये ठाकरे गटाला धक्का, माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत जाणारनाशिकमध्ये ठाकरे गटाचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांच्या पत्नी, माजी नगरसेवक किरण गामने, पुंजाराम गामने आणि सीमा निगळ आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. तीन माजी नगरसेवकांचा आज मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे.
Murlidhar Mohol Live : ब्लॅक बॉक्स डाउनलोड केल्यावर अनेक छोट्या छोट्या गोष्टी समोर येतील- मुरलीधर मोहोळअहमदाबाद घटनेची चौकशी सुरू आहे छोट्या छोट्या गोष्टी सुरू आहेत ब्लॅक box डाउनलोड केल्यावर अनेक छोट्या छोट्या गोष्टी समोर येतील. केंद्रीय गृह सचिव यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. ३ महिन्यात अहवाल सादर होणार अशी माहिती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
Mumbai Live : कॅप्टन सुमित सभरवाल यांना वडील पुष्कराज यांनी वाहिली श्रध्दांजलीकॅप्टन सुमित सभरवाल यांचे वडील पुष्कराज यांनी मुंबईतील पवई येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या मुलाला भावनिक श्रद्धांजली वाहिली.कॅप्टन सभरवाल १२ जून रोजी अहमदाबादमध्ये उड्डाणानंतर लगेचच अपघातग्रस्त झालेल्या लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान चालवत होते. यात त्यांच्यासह 241 जणांना प्राण गमवावे लागले.
Khanapur Police : खानापुरातील प्रशिक्षण केंद्रातील वीस पोलिसांना विषबाधाखानापूर : पोलिस प्रशिक्षण केंद्रामध्ये वीसहून अधिक पोलिसांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. प्रशिक्षण केंद्रामध्ये विविध भागातील पोलिस आहेत. रविवारी सुटी असल्याने ते जेवण करण्यासाठी बाहेर गेले होते. काही जणांनी इतर ठिकाणी जेवण केले. काही जणांनी आपल्या घरच्या डब्यातून जेवण आणले होते. मात्र, रविवारी रात्री काही जणांना जुलाब-उलटी, ताप व डोकेदुखी सुरू झाली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना खानापूर येथील शासकीय रुग्णालयात सोमवारी सकाळी दाखल केले.
PM Modi : G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी पोहोचले कॅनडालापंतप्रधान नरेंद्र मोदी ५१ व्या जी-७ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅनडाला पोहोचले आहेत. अल्बर्टाच्या कनाकास्किस येथे जी-७ शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कॅनडाच्या कॅलगरी येथे पोहोचलेले पंतप्रधान मोदी लवकरच कनाकास्किसला जाणार आहेत.
Kolhapur Boundary Extension : कोल्हापूर हद्दवाढविरोधात आज वीस गावांत बंदकोल्हापूर : हद्दवाढीसंदर्भात पालकमंत्री प्रकाश आबिटकर व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील आमदार व खासदार यांची उद्या (ता. १७) मुंबईत बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत नागरिकांच्या भावना पोहोचाव्यात. यासाठी मंगळवारी (ता. १७) प्रस्तावित हद्दवाढीतील वीस गावांत बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती सर्वपक्षीय हद्दवाढ विरोधी समितीचे अध्यक्ष व उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Savarkar Madnaik : सावकार मादनाईक भाजपच्या वाटेवर, मुख्यमंत्र्यांबरोबर लवकरच होणार बैठकजयसिंगपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकार मादनाईक यांच्या भाजप प्रवेशाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. मादनाईक यांच्या रूपाने भाजपला शेतकरी चळवळीच्या मुशीत तयार झालेले नेतृत्व मिळणार आहे. शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष चिन्हावर निवडणूक लढविणारे ते प्रबळ दावेदार ठरणार आहेत.
Sant Namdev Maharaj Palkhi : संत नामदेव महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थानहिंगोली : ‘जय जय राम कृष्ण हरी’च्या गजरात संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याचे नरसी नामदेव (ता. हिंगोली) येथून सोमवारी दुपारी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. या पालखी सोहळ्यात शेकडो वारकरी सहभागी झाले आहेत. परभणी आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज शहरात स्वागत करण्यात आले. शहरातील अनेक भागांत भजन, सप्ताहाचे आयोजन केले होते.
Monsoon Update : पुढील दोन दिवसांत मॉन्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाजपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) तब्बल तीन आठवड्याची विश्रांती घेतल्यानंतर पुढील प्रवास पुन्हा सुरू केला आहे. आज मॉन्सूनने संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा व्यापून विदर्भाच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. पुढील दोन दिवसांत मॉन्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. सोमवारी (ता. १६) मॉन्सूनने पुन्हा सक्रिय होत विदर्भाचा उत्तर भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेशचा काही भाग, छत्तीसगड, ओडिशाच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे.
Jayashree Patil : काँग्रेसमधून निलंबित केलेल्या नेत्या जयश्री पाटील यांचा उद्या मुंबईत भाजप प्रवेशLatest Marathi Live Updates 17 June 2025 : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा आणि काँग्रेसमधून निलंबित केलेल्या नेत्या जयश्री पाटील यांनी अखेर भाजपमधील प्रवेशावर शिक्कामोर्तब केलं. याबाबतची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित करण्यात आली. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात रविवारपासून सुरू असलेल्या दमदार पावसाने आजही जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत रविवारी रात्री नऊ ते सोमवारी रात्री नऊ या चोवीस तासांत नऊ फूट आठ इंचांनी वाढ झाली. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) तब्बल तीन आठवड्याची विश्रांती घेतल्यानंतर पुढील प्रवास पुन्हा सुरू केला आहे. मॉन्सूनने संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा व्यापून विदर्भाच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. पुढील दोन दिवसांत मॉन्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध अपमानास्पद पोस्ट टाकणाऱ्या हदीमनी यांना अटक करण्याची मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते एन. रविकुमार यांनी केली. ‘जय जय राम कृष्ण हरी’च्या गजरात संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याचे नरसी नामदेव (ता. हिंगोली) येथून सोमवारी दुपारी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. या पालखी सोहळ्यात शेकडो वारकरी सहभागी झाले आहेत. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..