नारायण सावंत यांच्यावर भाजपतर्फे दुहेरी जबाबदारी
esakal June 18, 2025 01:45 AM

71019

नारायण सावंत यांच्यावर
भाजपतर्फे दुहेरी जबाबदारी

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ ः भाजप कामगार मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नारायण सावंत यांच्यावर दुहेरी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पद कायम ठेवण्यासोबतच त्यांची कोकण विभाग प्रभारीपदीही नियुक्ती केली आहे. त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन भाजपने त्यांच्यावर हा विश्वास दाखविला आहे.
मुंबईतील नरिमन पॉईंट येथील भाजप कार्यालयात झालेल्या एका विशेष कार्यक्रमात सावंत यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी भाजप कामगार मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विजय हरगुडे, सरचिटणीस हनुमान लांडगे, चित्रपट आघाडी अध्यक्ष समीर दीक्षित आदी उपस्थित होते. संघटनात्मक कामाच्या सोयीच्या दृष्टीने आपणावर कोकण विभाग प्रभारी म्हणून अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात येत असल्याचे ॲड. हरगुडे यांनी दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे. सावंत यांच्या दुहेरी नियुक्तीमुळे कोकण विभागातील भाजप कामगार मोर्चाच्या कामाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.