सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, पण काही असे असतात जे थेट मनाला भिडतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एक तरुण आपल्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन आगळ्या-वेगळ्या पद्धतीने करताना दिसतोय.
व्हिडिओ एक तरुण आपल्या मित्रासह संपूर्ण बोगीत असलेल्या प्रवाशांना केक, चिप्स, समोसे आणि चॉकलेट वाटताना दिसत आहे. हे पाहून एक प्रवासी इतका भारावून गेला की त्याने लगेचच हे दृश्य कॅमेऱ्यात टिपलं आणि आपल्या लहाणपणीची आठवणी शेअर केली. त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
व्हिडिओमध्ये तरुण आपल्या मित्रासोबत ट्रेनच्या बोगीत आपला वाढदिवस साजरा करताना दिसतोय. केक कापून त्याने तो इतर प्रवाशांना वाटलाय. यासोबत समोसे, चॉकलेट आणि चिप्सही प्रवाशांना देताना तो दिसतोय. बोगीतील सर्व प्रवासी आनंदाने त्याला शुभेच्छा देताना, टाळ्या वाजवत दिसताय. दरम्यान एका प्रवाशाने या संपूर्ण क्षणाचं रेकॉर्डिंग करणारा म्हटलय., 'या भावाचा वाढदिवस होता आणि त्यानं संपूर्ण ट्रेनमध्ये पार्टी केली... केक, समोसा, चॉकलेट, चिप्स... खरंच बालपण परत आठवलं.'
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. एकाने लिहिलं, 'असं काही पाहून जुन्या वाढदिवसाच्या पार्टीज आठवल्या.' दुसऱ्याने म्हटलं, 'कोणत्या ट्रेनमध्ये मिळतात असे लोक' तर काहींनी याला 'लहानपणीच्या साधेपणाचं प्रतीक' म्हटलंय. तर काहींनी गंमतीत लिहिलं, 'मलाही अशी ट्रेन हवी' अशी कमेंट केलीय.हा व्हिडिओ @gharkekalesh या युजरनं ट्विटरवर शेअर केला आहे.