शीर्ष 10 सर्वात सुरक्षित एअरलाइन्स: 12 जूनला गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या ( Air India) विमानाचा मोठा अपघात (Ahmedabad plane crash) झाल्याची घटना घडली. यामध्ये विमानातील 242 प्रवाशांपैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं संपूर्ण देश हादरुन गेला आहे. या अपघातानंतर हवाई प्रवासाच्या सुरक्षिततेबद्दल जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, AirlineRatings.com ने 2025 च्या जगातील सर्वात सुरक्षित विमान कंपन्यांची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये पूर्ण-सेवा आणि कमी किमतीच्या दोन्ही श्रेणींमध्ये शीर्ष कंपन्यांचा समावेश आहे.
या यादीत, 385 विमान कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षातील अपघात किंवा गंभीर अपघातांचा रेकॉर्ड, पायलट प्रशिक्षण, ताफ्याचे वय आणि आकार, नफा आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा प्रमाणपत्र (जसे की IOSA आणि ICAO) अशा अनेक पैलूंवर त्यांची तपासणी करण्यात आली आहे.
ब्रिटिश एअरवेज, लुफ्थांसा, जपान एअरलाइन्स (जेएएल) आणि एअर कॅनडा सारख्या मोठ्या कंपन्यांचाही टॉप 25 मध्ये समावेश आहे. तर भारतातील इंडिगो आणि एअर एशिया इंडिया कमी किमतीच्या विमान कंपन्यांच्या यादीत समाविष्ट झाला आहेत. यासोबतच, रायनएअर, इझीजेट, जेटब्लू, साउथवेस्ट सारख्या कंपन्या देखील या यादीत अव्वल स्थानावर आहेत.
AirlineRatings.com ने जाहीर केलेल्या 2025 च्या सुरक्षा रेटिंगनुसार, स्पाइसजेटला भारतातील सर्वात सुरक्षित विमान कंपनी म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यांना 7 पैकी पूर्ण 7 स्टार मिळाले आहेत. यानंतर, इंडिगो आणि अकासा एअरला 7 पैकी 6 स्टार देण्यात आले आहेत. जे त्यांची चांगली कामगिरी समजली जाते. त्याच वेळी, एअर इंडियाला फक्त 4 स्टार मिळाले आहेत आणि तिची उपकंपनी एअर इंडिया एक्सप्रेसला फक्त 2 स्टार रेटिंग मिळाले आहे. एअर इंडियाची ही घसरण रँकिंग अलिकडच्या AI171 विमान अपघातानंतर समोर आली आहे, ज्यामुळे तिला जागतिक सुरक्षा यादीतही स्थान मिळालेले नाही. या आकडेवारीवरून स्पष्ट होते की देशातील काही विमान कंपन्यांनी सुरक्षिततेच्या बाबतीत चांगली कामगिरी केली आहे, परंतु एअर इंडियासारख्या महाकाय कंपनीला अजूनही सुधारणा करायची आहे.
एकीकडे भारतातील काही कमी किमतीच्या विमान कंपन्या आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण करत असताना, देशातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी विमान कंपनी एअर इंडियाच्या सुरक्षा रेटिंगमध्ये मागे पडल्याने सुधारणा करण्याची तीव्र गरज असल्याचे दिसून येते.
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा