इस्रायल आणि इराणमधील युद्ध आणखी तीव्र झाले आहे. इस्रायलकडून इराणवर सतत हल्ले होत आहेत. इराणची राजधानी तेहरानमध्ये प्रचंड स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. तसेच आगीच्या ज्वाळा आकाशात झेपावताना दिसत आहेत. हा हल्ला तेहरानच्या लावीझान भागात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या भागात इराणच्या क्षेपणास्त्र आणि लष्करी कार्यक्रमाशी संबंधित मोठे कारखाने आणि बंकर आहेत. त्याच बरोबर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे सुरक्षा बंकर देखील याच भागात असल्याची माहिती समोर आले आहे.
खामेनी निशाण्यावर?
इस्रायलने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना लक्ष्य केले असल्याचं बोललं जात आहे. कारण काही काळापूर्वीच खामेनी यांनी जनतेला संबोधित करतान इस्रायल आणि अमेरिकेला गंभीर इशारा दिला होता. त्यानंतर हा हल्ला झाला आहे. यात इराणचे मोठे नुकसान झाल्याची भीती आहे. हा हल्ला इतका जोरदार होता की आजूबाजूच्या परिसरातील खिडक्याही हादरल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
खामेनी यांचे रेकॉर्डेड भाषण
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी एका मुलाखतीत खामेनींच्या मृत्यूनंतर हे युद्ध थांबेल असं विधान केलं होतं. आज खामेनी यांनी जनतेला संबोधित केले त्याच वेळी इस्रायली लढाऊ विमाने तेहरानसह अनेक ठिकाणी बॉम्ब हल्ला करत होती अशी माहिती समोर आली आहे. मात्र खामेनी यांचे हे भाषण लाईव्ह नव्हते, तर काही तासांपूर्वी रेकॉर्ड केले होते. इस्रायली हल्ल्यात इराणी खामेनी यांचा बंकर परिसर टार्गेट करण्यात आला होता. त्यामुळे आता इराणही इस्रायलवर मोठा हल्ला करण्याची शक्यता आहे.
तेहरान पेटलं
इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमुळे इराणची राजधानी तेहरानच्या अनेक भागात स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिकांना शूट केलेल्या व्हिडिओंमध्ये पूर्व आणि पश्चिम तेहरानमध्ये मोठे होत असल्याचे दिसत आहेत. एका व्हिडिओमध्ये पूर्वेकडील भागात नोबोन्याद क्षेत्राजवळ एक मोठा स्फोट होताना दिसत आहे, तसेच इतरही महत्वाच्या ठिकाणी असे स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.