शशांक खेतानच्या दिग्दर्शनात होणार साजिद नाडियाडवाला यांचा मुलाचा ग्रँड डेब्यू?
esakal June 20, 2025 02:45 AM

Bollywood News : साजिद नाडियाडवाला यांचा मुलगा सुभान नाडियाडवाला लवकरच रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. ‘छिछोरे’, ‘हीरोपंती’ आणि ‘हाउसफुल’सारखे हिट चित्रपट देणाऱ्या साजिद यांच्यासाठी हा क्षण खास आहे, कारण यावेळी ते निर्माता म्हणून नव्हे तर एक वडील म्हणूनही नव्या इनिंगला सुरुवात करणार आहेत. सुभानच्या डेब्यूसाठी सध्या एक भव्य आणि भावनिक प्रेमकथा उभारली जात असून, या चित्रपटाचं टेम्पररी शीर्षक आहे – ‘ऐसी दीवानगी देखी नहीं कहीं’.

हा चित्रपट ‘हंपी शर्मा की दुल्हनिया’ फेम शशांक खेतान दिग्दर्शित करणार असून, त्याचं शूटिंग येत्या नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हे शीर्षक १९९२ च्या ‘दीवाना’ चित्रपटातील सुप्रसिद्ध गाण्यावरून प्रेरित आहे. या चित्रपटातून शाहरुख खानचं पदार्पण झालं होतं, तर दिव्या भारती – जी साजिद नाडियाडवालांची पत्नी होती – हिचं ते लक्षवेधी काम होतं. त्यामुळे हे शीर्षक त्यांच्या आठवणींना दिलेली एक सुंदर आदरांजली ठरत आहे, असंही बोललं जातं.

चित्रपट सध्या प्री-प्रोडक्शन टप्प्यात असून कलाकारांची अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे. सुभानच्या जोडीदाराची निवड कोण असेल, याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे. साजिद नाडियाडवालांची निर्मिती आणि शशांक खेतानचं दिग्दर्शन – या स्टारकिडच्या डेब्यूसाठी ग्राउंड अगदी परफेक्ट तयार होत आहे.

सुभानबरोबर आणखी कोण कलाकार असणार ? त्याच्याबरोबर आणखी कोण अभिनेत्री स्क्रीन शेअर करणार हे अजून उघड झालं नाहीये. याविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागेल.

<असं उघड होणार सायलीचं तन्वी असल्याचं सत्य ? धक्कादायक कथानक आणि टर्निंग पॉईंट ; ठरलं तर..चे नवीन ट्विस्ट>
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.