Mangala Gauri Vrat Significance for Married Women: हिंदू धर्मात मंगळागौरी व्रताला विशेष महत्त्व आहे. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी हे व्रत करतात. हे व्रत श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी केलं जातं. वर्ष 2025 मध्ये श्रावण महिना 11 जुलैपासून सुरू होऊन 9 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या काळात मंगळागौरी व्रत चार मंगळवारी पाळलं जाईल.
कधी आहे मंगळागौर व्रतपहिलं व्रत: 15 जुलै 2025
दुसरं व्रत: 22 जुलै 2025
तिसरं व्रत: 29 जुलै 2025
चौथं व्रत: 5 ऑगस्ट 2025
मंगळागौर व्रत हे सौभाग्य, सुख-शांती आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाळलं जातं. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या संणांपैकी एक असलेला मंगळागौर हा सण खासकरून नवविवाहीत महिलांसाठी असतो. या दिवशी विविध पारंपरिक खेळ, गायन, नृत्य केले जाते. या दिवशी महिला देवी पार्वती आणि भगवान शंकराची पूजा करतात.
हे व्रत करताना महिला सकाळी स्नान करून संकल्प करतात आणि मंगळागौरीची पूजा, मंत्र, कथा आणि आरती करतात. संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यावर व्रत पूर्ण केलं जातं. काही महिला या दिवशी उपवास करून फक्त फळं, दूध किंवा हलका आहार घेतात.
मंगळागौर व्रताचे लाभपतीचे आरोग्य उत्तम राहते आणि आयुष्य वाढते
वैवाहिक जीवनात सामंजस्य, प्रेम आणि सुख वाढते
घरामध्ये सौख्य, समृद्धी आणि शुभतेचा वास राहतो
स्त्रीच्या मनोकामना पूर्ण होतात
आपत्य, कुटुंब आणि पतीसाठी रक्षाकवच मिळते