उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आज षण्मुखानंदमध्ये सोहळा पार पडत आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे. या सोहळ्यात उद्धव ठाकरेंनी जोरदार भाषण केले आहे. यावेळी त्यांनी भाषणाची सुरूवात माझ्या तमाम हिंदू बांधवांनो... अशा शब्दात केले. यानंतर कार्यकरर्त्यांनी मोठा जयघोष केला. यानंतर त्यांनी जोरदार फटकेबाजी सुरू केली आहे. त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. तर अनेक काळापासून सुरू असलेल्या राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सोफिया कुरेशी या सैन्यदलातील भगिनींचा अपमान विजय शाह करतो. ही नालायक औलाद भाजप मध्ये आहे. हा देश सुधारणार? ट्रम्प यांचा फोन आल्यावर यांचा आवाजच गेला. काय करायचे असे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे? चार दहशतवादी आत आले, ते गेले कुठे? पाताळात गेले, आकाशात गेले की भाजपात गेले? सांगता येत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे.
Shivsena Anniversay: "देशाला पंतप्रधान नाही, भाजपला आहे"; उद्धव ठाकरेंची PM मोदींवर कडवी टीका, भाजपवर साधलं शरसंधानते म्हणाले की, हिंदी सक्ती होऊ देणार नाही. गुजरात तामीळनाडूमध्ये जाऊन करून बघा. तिथे हिंदी सक्ती करा. गुजरातमध्ये हिंदीची सक्ती करा. घोटाळेबाज नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीसांचा फोटो आहे. मुंबई तोडायचा कट सुरू आहे. सगळे अदानीलादेत आहेत. पण ही मुंबई आम्ही तोडू देणार नाही. आता सगळीकडे एक चर्चा सुरू आहे. कधी एकत्र येणार? असं म्हणत पुढे त्यांनी मनसेसोबतच्या युतीवर वक्तव्य केले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या एका विषयाची चर्चा सुरू आहे. होणार का? कधी होणार? पण होणार की नाही होणार हे कळेल ना. जे राज्याच्या आणि जनतेच्या मनात आहे. तेच होणार. जे जनतेच्या मनात तेच मी करेन. पण हे होऊ नये म्हणून त्यांच्या मालकाचे नोकर गाठीभेटी घेऊ लागले आहेत. हॉटेलमध्ये भेट घेत आहेत. मुंबई परत आम्ही आमच्या ताब्यात घेणारच आहोत, असं ते म्हणाले आहेत.
Shivsena Vardhapan: एक कुणीतरी बाप ठरवा! उद्धव ठाकरेंकडून राणेंचा खरपूस समाचार; थेटच बोललेते पुढे म्हणाले की, मुंबई जर पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर मालकाच्या मित्राचं कसं होणार? अदानींचे कसे होणार? त्यामुळे मराठी माणसाची शक्ती एकवटता कामा नये. जे आज वर्धापनदिन साजरा करत आहेत. ते मालकांच्या नोकरांचे नोकर आहेत. यासाठी आमचं होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू आहेत. पण आमचं आम्ही बघून घेऊ, असं म्हणत त्यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.