Monsoon And Health : पावसाळ्यात हा काढा प्यायल्याने आजार राहतील दूर
Marathi June 20, 2025 10:25 AM
पावसाळा उन्हापासून कितीही दिलासादायक देणारा असला तरी आरोग्याच्या दृष्टीने तो चांगला मानलं जात नाही. कारण पावसाळा येताना अनेक आजारांना सोबत घेऊन येतो. या ऋतूतील सततच्या बदलत्या हवामानामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. ज्यामुळे तुम्हाला विविध व्हायरल इन्फेक्शन होण्याचा धोका निर्माण होतो. अशा वेळी तुम्ही घरगुती काढे प्यायला हवेत. विविध मसाल्यांपासून तयार करण्यात आलेले हे काढे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. आज आपण जाणून घेऊयात हे इम्युनिटी बूस्टर काढे कसे बनवायचे.
तुळस आणि काळी मिरी –
साहित्य –
- 2 कप पाणी
- 1 टीस्पून काळी मिरी
- 1 टीस्पून आले
- गूळ
- 1 टीस्पून देशी तूप
- 1-2 लवंगा
- तुळशीची पाने – 4 ते 5
कृती –
- भांड्यात तूप गरम करून घ्या. त्यात लवंग, बारीक केलेली काळी मिरी, आले आणि तुळशीची पाने मिक्स करा.
- मसाले चांगले परतून झाल्यावर त्यात पाणी आणि गूळ मिक्स करा.
- आता हे मिश्रण मध्यम आचेवर 10 मिनिटे उकळवा.
- तयार झाला आहे इम्युनिटी बूस्टर काढा.
आल्याचा काढा –
साहित्य –
- 1 इंच आले
- तुळशीची 10-12 पाने
- 2 ते 3 काळी मिरी
- 1/4 टीस्पून जिरे
- हळद
- मध
- 1 टीस्पून लिंबाचा रस
कृती –
- एका भांड्यात 1 ग्लास पाणी गरम करण्यास ठेवा.
- यात आले, तुळस, काळी मिरी, जिरे आणि हळद टाकून पुन्हा उकळी आणा.
- आता काढा गाळून घ्या.
- नंतर यात लिंबाचा रस आणि मध मिक्स करा.
- अशा पद्धतीने तयार झाले आहे हेल्दी काढा.
दालचिनी –
साहित्य –
- 1/2 टीस्पून आले पावडर,
- 1/2 टीस्पून बडीशेप
- 1/2 टीस्पून दालचिनी पावडर
- 1 लवंग
- 2कप पाणी
कृती –
- दालचिनीचा काढा तयार करण्यासाठी भांड्यात 2 कप पाणी टाकून गरम करून घ्यावे.
- आता त्यात सर्व साहित्य घालून 10 मिनिटे मिश्रण उकळू द्या.
- पाणी अर्धे होईपर्यंत काढा उकळवून घ्यावा.
- इम्युनिटी बूस्टर काढा तयार झाला आहे.
हेही पाहा –