Hing For Digestion: हिंग, ज्याला संस्कृतमध्ये 'हिंगु' आणि इंग्रजीत 'Asafoetida' असे म्हणतात, भारतीय स्वयंपाकघरात सहज सापडणारा मसाल्याचा घटक आहे. हे फक्त चव वाढवण्यासाठीच नाही, तर त्याचे अनेक औषधी उपयोग देखील आहेत. पचन सुधारण्यासोबतच, डायबिटीज, उच्च रक्तदाब (बीपी) आणि इतर आजारांवर हिंग प्रभावी घरगुती उपाय ठरू शकते.
भारतीय मसाल्यांचा खजिना आणि हिंगचे स्थानभारत हा मसाल्यांचा खजिना मानला जातो. येथे अनेक नैसर्गिक मसाले आहेत जे शरीरातील गंभीर आजारांवर नियंत्रण ठेवू शकतात. हेल्थएक्सपर्ट ल्यूक कौटिन्हो हिंगला एक ‘जादूई मसाला’ मानतात. त्यांच्या मते, हिंग विशेषतः डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, गॅस, आणि आयबीएस यांसारख्या तक्रारींमध्ये उपयुक्त आहे.
Lokmangal University: लोकमंगल कॉलेजेसकडून स्वतंत्र विद्यापीठाची उभारणी; कै. सुरेशचंद्र देशमुख यांच्या स्वप्नाला मूर्त स्वरूप जीवनशैलीतील बदलांसह हिंगाचा लाभजे लोक गॅस, पचनाच्या समस्या, डायबिटीज किंवा बीपी यांसारख्या सौम्य लक्षणांनी त्रस्त आहेत आणि औषधांऐवजी नैसर्गिक उपाय व जीवनशैलीतील बदल करून आरोग्य राखू इच्छितात, त्यांच्यासाठी हिंग एक प्रभावी पर्याय ठरू शकतो. योग्य आहार, व्यायाम आणि हिंगाचा मर्यादित वापर केल्यास आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
हिंग खाण्याचे फायदे- गॅस, ऍसिडिटी, आणि ब्लोटिंगसाठी हिंग अत्यंत फायदेशीर आहे.
- राजमा, चणे, डाळी खाल्ल्यानंतर होणारा गॅस आणि पोटफुगणे कमी करते.
- हिंगमध्ये कार्मिनेटिव्ह गुणधर्म असल्यामुळे अन्न सहज पचवण्यास मदत होते.
हिंग वापरण्याचे 3 सोपे उपाय- अन्न शिजवताना एक चुटकी हिंग घाला.
- डाळ, राजमा, चणे भिजवताना त्यात एक चुटकी हिंग टाका.
- जेवणानंतर ३० मिनिटांनी, एक चुटकी हिंग कोमट पाण्यात मिसळून प्या.
डायबिटीज व हाय बीपीसाठी उपायहिंगमध्ये अॅन्टी-इन्फ्लेमेटरी, अॅन्टी-डायबेटिक, अॅन्टी-स्पास्मोडिक, कार्मिनेटिव्ह, अॅन्टी-वायरल, अॅन्टी-फंगल, आणि अॅन्टी-हायपरटेन्सिव्ह गुणधर्म असतात. त्यामुळे हिंग फक्त पचनासाठीच नव्हे, तर फुफ्फुसांचे आरोग्य, रक्ताभिसरण आणि रक्तातील साखर नियंत्रणासाठीही उपयुक्त आहे.
हाय ब्लड प्रेशर कसा कमी होतो?हिंगमधील घटक रक्त पातळ करण्यास मदत करतात, ज्यामुळे:
- रक्ताभिसरण सुधारते
- रक्तदाब नियंत्रित होतो
- हिंग कधी वापरावा?
- पचनतंत्र कमकुवत असल्यास
- गॅस / फुगलेले पोट
- अस्थमा, ब्राँकायटिस, न्यूमोनिया
- पोटदुखी (Colic Pain)
- मासिक पाळीतील वेदना
- डोकेदुखी / मायग्रेन
UPSC Registration 2025: UPSC CDS, NDA/NA II परीक्षा 2025 साठी अर्जाची अंतिम तारीख आज, संधी गमावू नका! हिंग घेण्याच्या पद्धती डोकेदुखी, मायग्रेन, मासिक वेदनाएक चुटकी हिंग आणि अर्धा चमचा मेथी पावडर, हे कोमट पाणी किंवा ताकात मिसळून हळूहळू प्यावे.
गॅस-फुगलेल्या पोटासाठीजेवणानंतर 30 मिनिटांनी, एक चुटकी हिंग कोमट पाण्यात टाकून प्यावे.
अस्थमा, न्यूमोनिया, ब्राँकायटिस यासाठी1 चमचा हिंग पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा व छातीवर लावून 2-3 तास तसेच ठेवा.
बाळांना कोलिक पेन असल्यासहिंग पाण्यात मिसळून पेस्ट तयार करून, नाभीच्या आजूबाजूला हलक्या हाताने फिरवत लावावी.