सोपानकाका पालखी सोहळ्यास अश्व मार्गस्थ
esakal June 21, 2025 02:45 AM

उंडवडी, ता. २० : संत सोपानकाका महाराज पालखीतील अश्वांचा मान अंजनगाव (ता. बारामती) येथील परकाळे कुटुंबीयांकडे आहे. परकाळे यांची तिसरी पिढी मानाच्या दोन अश्वांसह पालखी सोहळ्यात उत्साहात भक्तिभावाने सेवा करत आहे. यंदाही परकाळे बंधू मानाचे अश्व घेऊन पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सासवडकडे मार्गस्थ झाले.
अंजनगाव येथील येथील दिवंगत रामचंद्र परकाळे यांना सोपानकाका पालखीत अश्वांचा मान मिळाला आहे. ही सेवा तीन पिढ्यांपासून अखंडपणे सुरु आहे. सुरवातीला बाबूराव अण्णा नंतर त्यांचा मुलगा दिवंगत सोपान परकाळे यांनी १५ वर्षे सेवा केली. तसेच गेल्या पाच-सहा वर्षांपासून परकाळे यांच्या तिसऱ्या पिढीतील अजित परकाळे, राजेंद्र परकाळे, मयूर परकाळे अश्वांसह सेवा करत आहेत. हे मानाचे अश्व आषाढी वारीसाठी सासवड ते पंढरपूरकडे पालखी सोहळ्यात पुढे चालतात.
आज (ता. २२) सकाळी अंजनगाव येथे परकाळे यांच्या अश्वांचे भक्तीमय वातावरणात सासवडकडे प्रस्थान झाले. यावेळी टाळ मृदंग आणि हरी नामाचा जयघोष करण्यात आला. गोड भोजनानंतर मानाचे अश्व सासवडकडे मार्गस्थ झाले.
यावेळी पालखी सोहळा प्रमुख त्रिगुण महाराज गोसावी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास आटोळे, प्रमोद काकडे, सुरेश परकाळे, लक्ष्मण जगताप, बाळासाहेब परकाळे, दिलीप परकाळे, हनुमंत जगताप यांच्यासह भजनीमंडळ व वारकरी सांप्रदायिक मंडळी उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.