इस्तंबूलमध्ये तिच्या हनिमूनच्या वेळी कॉस्मेटिक सर्जरीसाठी गेलेली ३१ वर्षीय ब्राझिलियन-मोझांबिकन गायिका आणि इन्फ्लुअन्सर अॅना यांचे शस्त्रक्रियेनंतर काही तासांतच निधन झाले. या दुःखद घटनेमुळे तुर्कीमध्ये कॉस्मेटिक सर्जरीच्या जोखमींबद्दल पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अॅना शस्त्रक्रियेच्या आदल्या रात्री तिच्या सर्जनसोबत पार्टी केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, अॅना तिचे पती प्रसिद्ध मोझांबिक कलाकार एल्गर माइल्ससोबत इस्तंबूलला गेली. ही सहल हनिमूनचा भाग होती. तसेच एका खाजगी रुग्णालय, तुसा हॉस्पिटलसोबतच्या प्रमोशनल कराराचा भाग होती. अॅना बारबरा बुहर बुलद्रिनीला रुग्णालयाच्या प्रमोशनच्या बदल्यात मोफत स्तन वाढवणे, लिपोसक्शन आणि नाकाची शस्त्रक्रिया देण्यात आली. अॅनाला तिचे सौंदर्य वाढवायचे होते. ते तिचे स्वप्न होते. मे २०२५ मध्ये मोझांबिकमधील मापुटो येथे दोघांचे लग्न झाले आणि ही शस्त्रक्रिया त्यांच्यासाठी एक खास संधी होती.
Crime: 'त्या' गोष्टीवरून पती संतापला; रागात पत्नीला केलं टकली, म्हणाला- जा बाहेर, आता दाखव सुंदरता तुझी...शनिवारी (१४ जून २०२५) अॅना आणि एल्गर यांनी दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया करणाऱ्या सर्जनसोबत रात्रभर पार्टी केली. सुरुवातीला शस्त्रक्रिया ११ जून रोजी होणार होती. परंतु बरे होण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळावा म्हणून या जोडप्याने तारीख बदलण्याची विनंती केली. एल्गरचा आरोप आहे की, सर्जनने घाईघाईने रविवारी (१५ जून २०२५) शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन केले. आम्ही फक्त रविवारी क्लिनिकला भेटायला गेलो होतो. परंतु सर्जनने पूर्ण तयारी न करता प्रक्रिया सुरू करण्याचा आग्रह धरला.
अॅनाला शस्त्रक्रियेसाठी उपाशी राहावं लागलं होतं. परंतु तिने रात्रीच्या पार्टीनंतर जेवण केले होते. सर्जनने तिला आश्वासन दिले की सर्व काही ठीक होईल. रविवारी रात्री ११ वाजता अॅना ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आली. डॉक्टरांनी एल्गरला तिच्या बरे होण्याचा फोटो पाठवला. सांगितले की तिला भूल देण्यात आली आहे. लवकरच ती शुद्धीवर येईल. पण लवकरच परिस्थिती आणखी बिकट झाली.
Viral: शारिरीक संबंधावेळी पडदे उघडे राहिले; जोडप्याच्या खाजगी क्षणांचे लोकांनी व्हिडिओ बनवले, पंचतारांकित हॉटेलबाहेर रस्ता जामएल्गर म्हणाला की, क्लिनिक सहाय्यक विचित्रपणे वागत होते. मी १ तास १५ मिनिटे वाट पाहिली. मी खाली गेलो तेव्हा एका डॉक्टरने सांगितले की, तिचे हृदयाचे ठोके मंदावत आहेत. दुसऱ्याने मला सांगितले की, ती मृत आहे. शस्त्रक्रियेनंतर अॅनाला हृदयविकाराचा झटका आला. ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. मी नियंत्रण गमावले. मी रडलो, ओरडलो आणि भिंतींवर ठोसे मारले. ती शवगृहात सुंदर दिसत होती.
या प्रकरणी तुसा हॉस्पिटलने टर्किए टुडे द्वारे एक निवेदन प्रसिद्ध केले. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, अॅनाला दंत शस्त्रक्रिया रुग्ण म्हणून रेफर करण्यात आले होते. तिने सर्व आवश्यक संमती फॉर्मवर स्वाक्षरी केली होती. बरे होण्याच्या काळात अनपेक्षित गुंतागुंतीमुळे व्हेंट्रिक्युलर फायब्रिलेशन झाले. तिचा जीव वाचवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले. आमच्या तज्ज्ञ भूलतज्ज्ञ पथकाच्या सर्व प्रयत्नांनंतरही रुग्णाला वाचवता आले नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
Crime: मेहुण्यांनू! खूप दिवसानं आलोय, चिकन खाऊ घाला; पण नकार दिल्यानं दाजी भडकला, रागात मेहुण्याच्या पत्नीसोबत नको ते करून बसलामृत्यूचे कारण तपासण्यासाठी ते अधिकाऱ्यांना सहकार्य करेल असे रुग्णालयाने म्हटले आहे. एल्गरने इंस्टाग्रामवर त्याच्या अॅनाला श्रद्धांजली वाहिली. त्याने लिहिले की, सर्वकाही दुखावते - दोषींना शिक्षा होईल, जरी मला नरकात जाऊन लढावे लागले तरी. पण आता मीही तुटत आहे... माझ्या प्रिये. या घटनेमुळे पुन्हा एकदा तुर्कीमध्ये कॉस्मेटिक सर्जरीचे धोके अधोरेखित झाले आहेत. कमी खर्च आणि आकर्षक पॅकेजेसमुळे तुर्की हे वैद्यकीय पर्यटनाचे केंद्र आहे. परंतु कधीकधी अपुरी माहिती आणि घाई घातक ठरते. ब्रिटिश परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, २०१९ पासून तुर्कीमध्ये कॉस्मेटिक सर्जरीमुळे २८ ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनाच्या मृत्यूने तिच्या चाहत्यांना आणि कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.