मुसळधार पावसानानंतर आता राज्यातील वातावरणात पुन्हा बदल झाला. अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. यामुळे उकाडा वाढल्याचे दिसून आले आहे. मात्र तरीही येत्या २ ते ३ दिवसात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. येत्या काही दिवसांत राज्यात अति मुसळधार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
आयएमडीच्या अंदाजानुसार, शनिवार २१ जून रोजी मुसळधार पाऊस कमी होण्याची अपेक्षा आहे. मात्र सततच्या पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक नद्या धोक्याच्या पातळीच्या वर गेल्या आहेत. पालघर जिल्हा आणि नाशिक आणि पुण्याच्या घाट भागात अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करून हवामानाच्या इशाऱ्याची सर्वोच्च पातळी असलेला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Heavy Rain : कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यतामुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, रत्नागिरी आणि साताऱ्याच्या काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यामुळे नागरिकांना संभाव्य पूर आणि धोकादायक परिस्थितीचा इशारा देण्यात आला आहे. रायगडमध्ये, अंबा आणि कुंडलिका नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पाताळगंगा नदीसाठी देखील इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरीमध्ये जगबुडी नदीही धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहे. अंबा आणि जगबुडी सारख्या काही नद्यांमुळे त्यांच्या काठावरील काही शहरे पूरग्रस्त झाली आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात इंद्रायणी आणि इतर काही नद्याही पूरग्रस्त आहेत. नाशिकमध्ये, पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळेगोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात, स्थानिक हातेरी नदी ओव्हरफ्लो झाल्यामुळे कुडाळ तहसीलमधील नादर गावाचा संपर्क तुटला आहे. रत्नागिरीच्या संगमेश्वर तहसीलमधील कुचांबे गावात भूस्खलन झाले आणि ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.
हवामान विभागाने म्हटले आहे की, २२-२४ जून दरम्यान उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, २२ आणि २५ जून रोजी गंगीय पश्चिम बंगाल, २०-२३ जून दरम्यान बिहार, २२ जून पर्यंत झारखंड आणि ओडिशा, २५ जून पर्यंत मध्य प्रदेश, २० जून पर्यंत झारखंड, २१ जून रोजी पूर्व मध्य प्रदेश, २४ आणि २५ जून रोजी मध्य प्रदेश आणि २० जून रोजी छत्तीसगडमध्ये खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
Mumbai Rain Update: मुंबईला आज पावसाचा रेड अलर्ट; कोकण मध्य महाराष्ट्रात पुढील २४ तास कसे असेल हवामान?२५ जूनपर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २२ आणि २३ जून रोजी गुजरातमध्ये खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने २५ जूनपर्यंत गुजरात राज्य, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे बहुतांश/अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.