गोव्यात सर्वच ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना श्यामा प्रसाद मुखर्जी क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या राज्य स्तरीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेत, योग साधना केली.
भाजप २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत गोव्यात एकहाती सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. २०२७ ला २७ जागी विजय मिळवण्याचा निर्धार भाजपने केला आहे. विजय सरदेसाई यांचा बालेकिल्ला असलेल्या फातोर्डात २०२७ ला कमळ फुलणार असा निर्धार मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बोलून दाखवला आहे.