ENG vs IND : 41 धावात 7 झटके, टीम इंडियाला 471 धावां रोखलं, इंग्लंडचं जोरदार कमबॅक
GH News June 21, 2025 10:06 PM

इंग्लंडने टीम इंडियाला पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी लीड्समध्ये 500 धावा करण्यापासून रोखलंय. इंग्लंडने टीम इंडियाला पहिल्या डावात 471 धावांवर ऑलआऊट केलं आहे. टीम इंडियासाठी ओपनर यशस्वी जैस्वाल, कर्णधार शुबमन गिल आणि ऋषभ पंत या तिघांनी शतकी खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाला दुसऱ्या दिवशी 600 पार जाण्याची संधी होती. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशी जोरदार कमबॅक करत 500 धावांआधीच रोखलं. टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरमधील या तिघांशिवाय केएल राहुल याने 42 धावांची खेळी केली. मात्र याशिवाय इतरांना काही करता आलं नाही. त्यामुळे टीम इंडिया आणखी मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरली.

भारताची फलंदाजी

केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल या सलामी जोडीने 91 धावांची भागीदारी केली. त्यानंतर टीम इंडियाने झटपट 2 विकेट्स गमावल्या. केएल 42 धावा करुन आऊट झाला. तर डेब्यूटंट साई सुदर्शन याला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर यशस्वी आणि कर्णधार शुबमन गिल या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 163 बॉलमध्ये 129 रन्सची पार्टनरशीप केली. भारताने यशस्वीच्या रुपात तिसरी विकेट गमावली. यशस्वीने इंग्लंडमध्ये पहिल्याच सामन्यात पहिलं आणि एकूण पाचवं शतक ठोकलं. यशस्वीने 159 चेंडूत 16 चौकार आणि 1 षटकारांसह 101 धावा केल्या.

दुसऱ्या दिवसाचा खेळ

दुसऱ्या दिवशी पंतने 65 तर गिलने 127 धावांपासून खेळायला सुरुवात केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी आणखी 71 धावा जोडल्या. पंतने या भागीदारी दरम्यान 100 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार खेचत कसोटी कारकीर्दीतील सातवं शतक ठरलं. मात्र त्यानंतर शुबन गिल मोठा फटका मारण्याच्या नादात आऊट झाला आणि ही जोडी फुटली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 303 बॉलमध्ये 209 रन्सची पार्टनरशीप केली. शुबमनला कसोटी कर्णधार म्हणून पदार्पणात दीडशतक करण्याची संधी अवघ्या 3 धावांनी हुकली. शुबमनने 227 चेंडूत 1 षटकार आणि 19 चौकारांसह 147 धावा केल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.