शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यात दोनच समविचारी पक्ष असल्याचा दावा केला. ज्यामुळे राज्याच्या राजकारणाला नवे वळण लागण्याची शक्यता आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात युतीकडे संकेत देताना त्यांनी हा दावा केला आहे. पण त्याच्या या वक्तव्यामुळे आता महाविकास आघाडीला तडे? जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.
Sanjay Raut News : मोदी जागतिक बोलबच्चन महामंडळाचे अध्यक्ष, तर फडणवीस ज्युनिअर बोलबच्चन : राऊतशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. त्यांनी बोलबच्चनवरून फडणवीस आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना निशाण्यावर घेतलं आहे. तर बोलबच्चनगिरीवरून चिमटा काढताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनच ती प्रेरणा मिळते. मोदी हे जागतिक बोलबच्चन महामंडळाचे अध्यक्ष असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्युनिअर बोलबच्चन असल्याचा टोला राऊत यांनी लगावला आहे.
Dilip Sopal News : शिवसेनेच्या वर्धापन दिनाला सोलापूरच्या आमदाराची दांडी; गैरहजरीमुळे खळबळशिवसेना ठाकरे गटाचे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव आमदार असणारे दिलीप सोपल यांच्या एका कृतीमुळे सध्या सोलापूरसह राज्यात खळबळ उडाली आहे. सोपल यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिन आणि डिनर डिप्लोमासीला दांडी मारल्याने सध्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सोपल हे दोन दिवसापासून बार्शी मतदारसंघ आणि जिल्ह्याबाहेर असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर यापूर्वीही शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक महत्वाच्या बैठकांना आमदार दिलीप सोपल यांनी मारली होती दांडी. यामुळे आता चर्चेला उधाण आले आहे.
Sangli Dccbank News : शाखाधिकारी अन् सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने मारला व्याज, शासकीय अनुदानावर डल्लासांगली जिल्हा बँकेच्या गार्डी (ता. खानापूर) येथील शाखेत मोठा घोटाळा समोर आला आहे. शासकीय अनुदान व व्याजामध्ये तब्बल 30 लाखांच्या रक्कमेवरच डल्ला मारल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी शाखाधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असून या प्रकरणात शाखेतीलच एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचेही समोर आले आहे. सध्या या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू असून अहवालानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
Iran-Israel News LIVE Updates : भारत इराणमधून नेपाळ, श्रीलंकेच्या लोकांनाही बाहेर काढणारइराण आणि इस्रायलमधील सशस्त्र संघर्षामुळे आतापर्यंत सुमाने 600 हून अधिक लोक मारले गेले आहेत. भारताने आपल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. शुक्रवारी इराणहून भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एक विमान आले, ज्यात 290 भारतीय विद्यार्थी होते. आता आणखी दोन विमाने भारतात येणार आहेत. तर आता भारत नेपाळ आणि श्रीलंकेमधील नागरिकांनाही बाहेर काढण्यात मदत करणार आहे. याबाबतची माहिती भारतीय दूतावासाने ट्विटद्वारे दिली आहे.
इराण आणि इस्रायलमध्ये सध्या सशस्त्र संघर्ष सुरू आहे. आतापर्यंत येथे 600 हून अधिक लोक मारले गेले आहेत. यादरम्यान भारताने आपल्या लोकांना बाहेर काढण्याची मोहिम सुरू केली आहे. शुक्रवारी रात्री दिल्ली विमानतळावर इराणहून भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एक विमान आले. ज्यात 290 भारतीय विद्यार्थी होते. आजही आणखी दोन विमाने भारतात येणार आहेत.
Maharashtra News : अल्पवयीन बालिकेच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याची पत्नीला जामीनकल्याण पूर्वेतील एका अल्पवयीन बालिकेच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपी पती विशाल गवळीला मदत करणाऱ्या साक्षी गवळीला न्यायालयाने जामीन मंजूर केला. गुरूवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयातील पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व्ही. ए. पत्रावाले यांनी हा जामीन मंजूर केला. गुन्हा घडल्यानंतर मागील सात महिन्यांपासून ती तुरूंगात होती. ती विशाल गवळीने तळोजा कारागृहात आत्महत्या केली होती.
Iran Israel Conflict : इराणी ड्रोन इस्रायली सैन्याने पाडलाइस्रायली संरक्षण दलांनी (आयडीएफ) शनिवारी सांगितले की त्यांनी अलीकडेच एक इराणी ड्रोन (यूएव्ही) नष्ट केला आहे. ड्रोनच्या घुसखोरीमुळे गोलन हाइट्स परिसरात सायरन वाजवण्यात आले, ज्यामुळे स्थानिकांमध्ये काही काळ घबराट पसरली. आयडीएफने पुष्टी केली आहे की ड्रोन यशस्वीरित्या अडवण्यात आला आणि कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही.
Maharashtra Politics : उद्धव ठाकरे यांच्याकडे आता काय उरलयं : महाजनउद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सध्या पक्ष नाही, पक्षाचे चिन्ह नाही. शिंदेंची शिवसेना आहे त्यांच्याकडे शिवसेना पक्षाचे चिन्हही आहे. जे कोर्टाने मान्य केलं आहे. त्यांच्याकडे 45 आमदार सुद्धा आहेत. मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे उरलंय. दहा तर आमदार आहेत, आता तर त्यांची परिस्थिती अजून नाजूक असल्याचा टोला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भुसावळ येथे लगावला आहे.
ED raids in Huparit : कोल्हापूरच्या चंदेरीनगरी म्हणून ओळख असलेल्या हुपरीत ईडीची धाडीने खळबळकोल्हापूर जिल्ह्यातील चंदेरीनगरी म्हणून ओळखल्या असणाऱ्या हुपरीत बड्या चांदी व्यवसायिकावर ईडीची धाड पडली आहे. या धाडीमुळे हुपरीसह कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तर या बड्या चांदी व्यवसायिकाची तब्बल 15 तास चौकशी करण्यात आली असून व्यवसायिकाच्या कार्यालयाची झाडाझडती घेण्यात आली आहे. ही चौकशी निधी बँकशी संबंधित असून चौकशी दरम्यान कुणालाही महावीर नगर परिसरात फिरकू दिलेले नाही.