इराकमध्ये काम करणाऱ्या हीडलबर्ग युनिव्हर्सिटीच्या एका टीमने मोठे काम केले आहे.त्यांनी इराण येथील एक प्राचीन शहर निनवेह येथील राजा अशर्बनिपालच्या उत्तरेला महलातील सिंहासन कक्षात पुरातत्वज्ञ खोदकाम करीत असताना विशाल नक्षीकाम केलेले दोन मोठे हिस्से मिळाले आहेत. या 7th Century BC च्या असीरियन साम्राज्याचे शासकांच्या दोन प्रमुख देवता आणि अन्य आकृत्यासापडल्या आहेत.
‘आपल्याला माहित असलेल्या अॅसिरियन राजवाड्यांच्या कोणत्याही प्रतिमेत प्रमुख देवतांचे चित्रण नाही’. आजच्या मोसुलजवळील ( Mosul ) निनवे हे शहर मेसोपोटेमियाच्या सर्वात महत्त्वाच्या केंद्रांपैकी एक मानले जात असे. राजा सन्हेरीबच्या काळात, हे शहर इ.स.पूर्व ८ व्या शतकाच्या शेवटी अॅसिरियन साम्राज्याची राजधानी बनले असे पुरातत्व संस्थेचे सदस्य प्राध्यापक डॉ.अॅरॉन श्मिट यांनी म्हटले आहे.
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात, ब्रिटिश पुरातत्वशास्त्रज्ञांनी प्रथम उत्तरेकडील राजवाडा शोधला आणि शोधही लावले, जे आज लंडनमधील ब्रिटिश संग्रहालयात ठेवले आहेत. नवीन शोधात, अॅसिरियन साम्राज्याचा शेवटचा महान शासक असलेला राजा अश्शूरबानिपाल मध्यभागी आहे. राजाच्या दोन्ही बाजूला देव अश्शूर आणि देवी इश्तार आहेत. संशोधकांची टीम गोळा केलेल्या डेटाच्या मदतीने त्याच्या पुरातत्वीय संदर्भाचा अभ्यास करेल आणि तो प्रकाशित देखील करेल असे अॅरॉन श्मिट यांनी म्हटले आहे.
प्राध्यापक श्मिट यांनी सांगितले की हे मुर्तींचे तुकडे जमीनीत पुरण्यात आले होते, म्हणून १०० वर्षांपूर्वी ब्रिटिश पुरातत्वशास्त्रज्ञांना ते सापडले नाहीत. इराकी स्टेट बोर्ड ऑफ अँटिक्विटीज अँड हेरिटेज (SBAH) च्या सहकार्याने, हे कोरीव काम त्यांच्या मूळ जागी परत ठेवण्याचा आणि सार्वजनिक दर्शनासाठी ते खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.