Metro In Dino Collection : सारा अन् आदित्यच्या केमिस्ट्रीची चाहत्यांना भुरळ, 'मेट्रो इन दिनों' चित्रपटानं ५ दिवसांत जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला
Saam TV July 09, 2025 06:45 PM

बहुप्रतिक्षित चित्रपट 'मेट्रो इन दिनों' (Metro In Dino) 4 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटामुळे सारा अली खान आणि आदित्य रॉय कपूर चांगलेच चर्चेत पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचे यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. दोघे एकत्र खूपच क्युट दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

अनुराग बासू दिग्दर्शित 'मेट्रो इन दिनों' चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात थोडा अयशस्वी ठरतोय असे बोलायला काही हरकत नाही. कारण चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घट तसेच चढउतार पाहायला मिळत आहे. चित्रपटाने पाच दिवसांत किती कमाई केली, जाणून घेऊयात.

'मेट्रो इन दिनों' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 5
  • दिवस पहिला - 3.5 कोटी रुपये

  • दिवस दुसरा - 6 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 7.25 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 2.5 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 2.9 कोटी रुपये

  • एकूण - 22.15 कोटी रुपये

View this post on Instagram

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

'मेट्रो इन दिनों'

'मेट्रो इन दिनों' चित्रपट 'लाइफ इन अ मेट्रो'चा सीक्वल आहे. 'मेट्रो इन दिनों' चित्रपटात चार जोड्या पाहायला मिळत आहे. यांच्यामधील केमिस्ट्रीने प्रेक्षकांना वेड लावले आहे.

  • सारा अली खान-आदित्य रॉय कपूर

  • कोंकणा सेन शर्मा - पंकज त्रिपाठी

  • अनुपम खेर - नीना गुप्ता

  • फातिमा सना शेख - अली फजल

'लाइफ इन अ मेट्रो'

'लाइफ इन अ मेट्रो' हा चित्रपट 2007 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात इरफान खान, कोंकणा सेन शर्मा, के के मेनन, शायनी आहुजा, शिल्पा शेट्टी, कंगना रणौत आणि शर्मन जोशी पाहायला मिळाले. हा देखील एक रोमँटिक ड्रामा आहे.

Hindi Movies OTT Update : 'माँ' अन् 'मेट्रो इन दिनों' चित्रपट ओटीटीवर कुठे अन् कधी पाहता येणार? वाचा अपडेट
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.