शुबमन गिल याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडवर मात करत दुसरा कसोटी सामना जिंकला. भारताने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली.त्यानंतर आता उभयसंघात 10 जुलैपासून तिसरा सामना होणार आहे. त्याआधी 9 जुलैला वूमन्स टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात टी 20i मालिकेतील चौथ्या सामन्याचा थरार रंगणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. हा सामना कधी आणि कुठे पाहायला मिळेल? हे जाणून घेऊयात.
इंग्लंड विरुद्ध इंडिया वूमन्स चौथा टी 20i सामना बुधवारी 9 जुलैला खेळवण्यात येणार आहे.
इंग्लंड विरुद्ध इंडिया वूमन्स चौथा टी 20i सामना एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड मँचेस्टर,येथे खेळवण्यात येणार आहे.
इंग्लंड विरुद्ध इंडिया वूमन्स चौथ्या टी 20i सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरुवात होईल. तर त्याआधी 10 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
इंग्लंड विरुद्ध इंडिया वूमन्स चौथा टी 20i सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर हा सामना सोनी लिव्ह एपवर पाहायला मिळेल.
वूमन्स टीम इंडिया या मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाला तिसरा सामना जिंकून मालिका विजयाची संधी होती.मात्र इंग्लंडने तिसऱ्या आणि ‘करो या मरो’ सामन्यात भारतावर मात करत मालिकेतील आव्हान कायम राखलं. त्यामुळे आता दोन्ही संघांसाठी चौथा सामना हा निर्णायक ठरणार आहे.
भारताला चौथ्या सामन्यात विजय मिळवून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर इंग्लंडचा हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न असणार आहे. अशात आता हा सामना कोण जिंकतं? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दरम्यान या मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक धावा आणि विकेट्सचा विक्रम भारताच्या नावावर आहे. या मालिकेत स्मृती मंधाना हीने सर्वाधिक 181 धावा केल्या आहेत. तर श्री चरणी हीने सर्वाधिक 8 विकेट्स मिळवल्या आहेत.