आई-मुलाचं नातं हे प्रेमाचं, विश्वासाचं आणि पवित्र असतं. पण काही लोक या नात्यालाही कळिमा फासण्यास पुढेमागे पहात नाहीत. हरियाणातील नूह येथूनही असाच एक प्रकार समोर आला आहे. तेथे एका माणसाची पहिली पत्नी मरण पावल्यावर त्याने दुसरं लग्न केलं. पण त्याचा स्वत:चा मुलगाच, त्या इसमाच्या नव्या पत्नीला घेऊन पळून गेल्याने तो इसम हादरलाच. हो, हे खरं आहे. हरियाणातील एका गावात एका मुलाने त्याच्या सावत्र आईसोबत पळून जाऊन कोर्ट मॅरेज केलं आहे. यामुळे गावातील घराघरांत या प्रकरणाची उलटसुलट चर्चा रंगली आहे.
मात्र घडलेल्या प्रकारामुळे त्या मुलाच्या वडिलांना मात्र त्याच्या वडिलांना प्रचंड धक्का बसला असून त्याने कसंबसं पोलिस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत. संपूर्ण गावात या प्रेमकथेची चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रथम तो मुलगा त्याच्या सावत्र आईला न्यायालयात घेऊन गेला. तिथे दोघांनीही कोर्ट मॅरेज केलं आणइ नंतर दोघेही तिथून फरार झाले. हे ऐकल्यावर त्या मुलाच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पण तुमचा मुलगा आणि तुमची बायको दोघेही प्रौढ आहेत, असं पोलिसांनी त्यांना सांगितलं.
पहिल्या पत्नीच्या निधनानंतर केलं दुसरं लग्न पण…
रिपोर्टनुसार, पीडित इसम हरियाणाच्या नूंहमध्ये राहतो. त्याच्या पहिल्या पत्नीचे निधन झाल्याने त्याने दुसरं लग्न केलं. लग्नानंतर मी , माझी बायको आणि अल्पवयीन मुलगा असे तिघे राहू लागलो. तो तिला आई म्हणायचा पण त्याच काळात माझा मुलगा आणि माझीच पत्नी, त्याची सावत्र आई, यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर दोघांनीही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. मला याची काहीच कल्पना आली नाही, असं त्याने पोलिसांना सांगितलं. दोघेही घरातून दागिने आणि अनेक मौल्यवान वस्तू घेऊन पळून गेले आणि कोर्टात लग्न केले.
जिला आई म्हणायचा, आशिर्वाद घ्यायचा तिलाच पळवलं…
त्या इसमाने सांगितलं की, त्याचा मुलगा त्याच्या सावत्र आईच्या पायांना स्पर्श करायचा, आशिर्वाद घ्यायचा. पण त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम कधी जडलं आणि ते कधी एकत्र पळून गेले, कळलंच नाही. ते दोघेही घरातून 30 हजार रुपये, दागिने आणि अनेक मौल्यवान वस्तू घेऊन पळून गेले असंही त्या इसमाने फिर्यादीत नमूद केलं.
जेव्हा तो माणूस आपल्या पत्नी आणि मुलाविरुद्ध पोलिसांकडे तक्रार घेऊन आला तेव्हा त्याने पोलिसांना सांगितले की मुलगा अल्पवयीन आहे. अशा परिस्थितीत, दोघांचाही न्यायालयात झालेला विवाह बेकायदेशीर आहे असा दावा त्याने केला.
मात्र, पोलिसांनी त्या व्यक्तीचा दावा फेटाळून लावला. दोघांनीही न्यायालयात त्यांच्या प्रौढत्वाचा पुरावा दिला आहे आणि आता दोघेही विवाहित आहेत, असे पोलिस म्हणाले. या प्रकरणाची चौकशी केली जाईल असंही पोलिसांनी सांगितलं.