अनेकदा शुटींगदरम्यान विशेषत: इंटीमेट सीन करताना अभिनेत्रींना बऱ्याच अडचणी येतात. बॉलिवूडमध्ये हे किस्से आताच नाही तर 70-80 च्या काळातही घडले आहेत. असाच एक किस्सा घडला होता एक चित्रपटाच्यावेळी. ज्यात अभिनेत्रीला एका सीनसाठी कपडे काढायचे होते. पण ती एवढी घाबरली होती किती तिला हा सीन कसा करावा हे समजत नव्हतं. तेव्हा अभिनेत्याने तिची त्या सीनसाठी मदत केली.
चित्रपटातील एक सीनबाबत अभिनेत्रीला प्रचंड अस्वस्थ वाटत होतं
ही अभिनेत्री म्हणजे सिमी गरेवाल आणि अभिनेते होते शशी कपूर. शशी कपूर यांना अतिशय देखणा आणि रोमँटिक इमेज असलेले हिरो म्हटले जायचे. ‘सिद्धार्थ’ चित्रपटात शशी कपूर आणि सिमी गरेवाल स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटातील एक सीन असा होता ज्याबद्दल तिला खूप अस्वस्थ वाटत होते.
एक सीन असा होता जिथे अभिनेत्रीला कपडे काढावे लागणार होते
चित्रपटात एक सीन असा होता जिथे तिला कपडे काढावे लागणार होते. मात्र ती घाबरली होती. ती थोडी अस्वस्थही होती. तेव्हा शशी कपूर यांनी सिमी गरेवाल समजावलं. त्यांनी तिला धीर दिला आणि सीन शूट करण्यासाठी मदत केली.हा किस्सा सिमीने स्वत:च एका मुलाखतीत सांगितला होता. सिमी गरेवाल म्हणाली, ‘मला त्या दृश्यात खूप अस्वस्थ वाटत होते. मी बॉडी स्टॉकिंग घातले होते आणि मला टॉपलेस व्हायचे होते. मला याची खूप भीती वाटत होती. मला लाज वाटत होती’
शशी कपूर अभिनेत्रीकडे गेले अन् तिला समजावलं
मग शशी कपूर सिमी गरेवालकडे आले. तिला समजालं की आणि म्हणाले ‘सिमी लाजण्याची गरज नाही. तू खूप सुंदर आहेस.’ हे ऐकून सिमीला आत्मविश्वास आला आणि मग तिने तो बोल्ड सीन शूट केला. याचित्रपटात दोघांचा एक इंटिमेट सीन होता जिथे ते किस करताना दिसले होते. आणि त्याकाळी हा सीन प्रचंड व्हायरल झाला होता.
तर अशापद्धतीने शशी कपूर यांनी सिमी गरेवालला बरीच हिंमत दिली आणि चित्रपटातील तो सीन सिमी सहजतेने करू शकली. त्याबाबत ती आजही शशी कपूर यांचं कौतुक करतेय.