मोठी बातमी! राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय, अखेर विधानसभेत मोठी घोषणा
Tv9 Marathi July 10, 2025 02:45 AM

मोठी बातमी समोर येत आहे, आज राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तुकडा बंदी कायदा रद्द करण्यात आला आहे. याबाबत विधानसभेत घोषणा करण्यात आली आहे. यामुळे आता लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली आहे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा हा ऐतिहासिक निर्णय आहे. लवकरच या संदर्भात एक एसओपी तयार करण्यात येणार आहे.

नेमकं काय म्हणाले बावनकुळे? 

तुकडे बंदी कायदा आम्ही रद्द करत आहोत, लवकरच आम्ही त्या संदर्भातील नोटिफिकेश आम्ही काढणार आहोत, लवकरच या कायद्यामध्ये आम्ही बदल करणार आहोत. आम्ही या कायद्यासंदर्भातील सर्व बंधण मुक्त करत आहोत, लवकरच आम्ही एक एसओपी या संदर्भात जारी करू, ज्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचं काम अधिक सोप होईल, त्यांना सरकार दरबारी हेलपाटे मारण्याची गरज राहणार नाही असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांना दिलासा 

पावसाळी अधिवेशन सुरू आहे, याचदरम्यान सरकारनं आता मोठा निर्णय घेतला आहे. तुकडा बंदी कयदा रद्द करण्यात आला आहे. या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत घोषणा केली. आम्ही या कायद्यासंदर्भातील सर्व बंधणं मुक्त करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान हा कायदा रद्द झाल्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून हा कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी सुरू होती. अखेर हा कायदा आता सरकारने रद्द केला आहे. विधानसभेत या संदर्भात घोषणा करण्यात आली आहे. या संदर्भात घोषणा करताना लवकरच आम्ही एक एसओपी या संदर्भात जारी करू, ज्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचं काम अधिक सोप होईल, त्यांना सरकार दरबारी हेलपाटे मारण्याची गरज राहणार नाही असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

काय आहे तुकडा बंदी कायदा?

तुकडा बंदी कायद्यानुसार प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा जमीन खरेदी किंवा विक्री करण्यात प्रतिबंध होता, एक, दोन, तीन अशी गुंठ्यामध्ये जमीन खरेदी किंवा विक्री करता येत नव्हती, मात्र आता हे निर्बंध हटवले जाणार आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.