राहुरी : खडांबे बुद्रुक येथे सोमवारी (ता. ७) रात्री एका शेतकऱ्याच्या वस्तीवर बिबट्याने हल्ला केला. त्यात शेतकऱ्याच्या तीन शेळ्या बिबट्याने ठार केल्या. रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान एका मादी बिबट्याने दोन पिल्लांसह शेतकरी दिनकर गोपीनाथ जाधव (रा. खडांबे बुद्रुक) यांच्या वस्तीवर धुमाकूळ घातला.
Success Story: 'संकटावर मात करत डॉ. आदित्य चिंचकर यांची युपीएससीत धडाकेबाज घोडदौड'; मिळवली ४० वी रँकशेतकरी जाधव यांच्या घराजवळ बांधलेल्या तीन शेळ्यांवर बिबट्यांनी हल्ला चढविला. त्यात, दोन शेळ्या जागीच ठार झाल्या. एक शेळी जाधव यांनी जनावरांच्या चाऱ्यासाठी लावलेल्या गिन्नी गवतात बिबट्याने ओढून नेली. तेथे शेळीचा फडशा पाडला. जाधव यांनी आरडाओरड केली.
घटनेची माहिती समजताच शिवसेना (शिंदे गट) तालुका उपप्रमुख प्रशांत खळेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. यावेळी संकल्प पवार, अरुण जाधव, मिलिंद हरिश्चंद्रे, गीताराम जाधव, अशोक जाधव आदींसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.
Success Story: शंकरबाबांची दृष्टिहीन कन्या माला झाली सरकारी अधिकारी; दत्तक कन्येला वडिलांचे नावच नाही, ममत्वही मिळालंवनपाल राजू रायकर यांनी वन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. तेलोरे यांनी मृत शेळ्यांची जागेवर उत्तरीय तपासणी करून अहवाल दिला.