International Yoga Day: शिवनेरीवर आंतरराष्ट्रीय योगदिनाचा उत्साह; १५० जणांचा सहभाग
esakal June 22, 2025 01:45 AM

जुन्नर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी किल्ले शिवनेरीवर आज ता.२१ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने भारताच्या प्राचीन योग परंपरा सादरीकरणाचा उत्साह पहावयास मिळाला.

जुन्नर व ओतूर येथील महाविद्यालयाचे एनसीसी कॅडेट, एनएसएसचे विद्यार्थी, भारतीय पुरातत्व विभाग व जुन्नर तहसील कार्यालयाचे कर्मचारी तसेच शिवछत्रपती महाविद्यालयाचे राज्य व राष्ट्रीय खेळाडू असे सुमारे १५० जण यात सहभागी झाले होते.

सुर्योदयाच्या साक्षीने शिवजन्मस्थळी विखुरलेल्या किरणांच्या पखरणीत योगउर्जेचा हा उत्साह उपस्थितांना आगळी उर्जा देत होता. सकाळच्या प्रसन्न वातावरणात योगासनांची ही उर्जा सर्वांचा आनंद द्विगुणित करणारी ठरली. केंद्रीय पुरातत्व विभागाच्या वतीने योग साधना उपक्रमाचे देशभर आयोजन करण्यात आले होते. त्याचाच भाग म्हणून शिवजन्मस्थळी देखील आयोजन करण्यात आले होते.

पुरातत्व खात्याचे अधिक्षक उपअभियंता संजीव मंडल,सर्वेक्षक सहाय्यक बाबासाहेब जंगले,सहाय्यक पुरातत्वज्ञ रवीराज, तालुका क्रीडा अधिकारी शोभा खेडेकर-पालवे,निवासी नायब तहसिलदार सारिका रासकर आदींनी योगदिनाच्या उपक्रमात सहभाग घेतला.

International Yoga Day: बारामतीत योगशिबीराचे आयोजन, 2500 महिलांचा सहभाग; पुरुषांचाही उत्साह

योगअभ्यासक विजय गुंडे यांनी उपस्थितांना योगाचे धडे दिले तसेच योगमुद्रांचे सादरीकरण करुन घेतले. भारतीय पुरातत्व विभाग मुंबई सर्कलच्या वतीने संभाजीनगरमधील एलिफंटा, पुण्यातील आगाखान पॅलेस आणि किल्ले शिवनेरीवर या विशेष योग सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले होते.

बारामतीत योगशिबीराचे आयोजन

जागतिक योगादिनाचे औचित्य साधून बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्क येथे आयोजित योग शिबीरात एकाच वेळेस अडीच हजार महिलांनी सहभाग घेतला. एकाच वेळेस इतक्या मोठ्या संख्येने योगासन करण्याचा औदयोगिक क्षेत्रातील बारामतीतील हा पहिलाच प्रयोग होता.

कासा पोलीस ठाण्यात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

जगभरात साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय योग दिन डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्यातही उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी साडेसात वाजता आयोजित कार्यक्रमात पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेत योगासनांद्वारे दिनाची सुरुवात केली. यावेळी शेणसरी शाळेतील अनुभवी योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम आणि ताणतणाव कमी करणारे व्यायाम प्रकार सादर करण्यात आले. प्रशिक्षकांनी योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम समजावून सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.