फायर इंजिनिअरिंग कॉलेजचा १०० टक्के निकाल
esakal June 22, 2025 01:45 PM

72216, 72218, 72219
फायर इंजिनिअरिंग कॉलेजचा १०० टक्के निकाल
कोल्हापूर, ता. २१ : खराडे कॉलेज कॅम्पसमधील महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळअंतर्गत कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग अॅन्ड सेफ्टी मॅनेजमेंटचा निकाल १०० टक्के लागला. अॅडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टीमध्ये वैष्णवी पाटील (८९.३३ टक्के), डिप्लोमा इन फायर सर्व्हिस इंजिनिअरिंग प्रथम वर्षात शुभम दरवान (८४.८०) तर द्वितीय वर्षामध्ये तन्मय वासावे (८२.६०) यांनी प्रथम कमांक पटकावला. या वर्षांमध्ये १६५ विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले असून विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. यंदाही १०० टक्के प्लेसमेंट करण्याचा मानस कॉलेजचा आहे. विद्यार्थ्यांना संस्थापक युवराज पाटील, प्राचार्य डॉ. किरण पाटील, विभागप्रमुख उत्तम माळी, प्रा. अजय महाडिक, प्रमोद मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रवेशप्रकिया सुरू झाली असून मोजक्याच जागा शिल्लक आहेत. इच्छुकांनी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. पाटील यांनी केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.