Dividend Stocks : जूनच्या शेवटच्या आठवड्यात लाभांशाचा पाऊस, ३० हून अधिक कंपन्या देणार भागधारकांना नफा
मुंबई : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी पुढचा आठवडा मोठ्या कमाईचा असणार आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात ३० हून अधिक कंपन्या त्यांच्या भागधारकांना लाभांश देतील. वेगवेगळ्या कंपन्यांनी त्यांचा नफा भागधारकांसोबत वाटण्यासाठी हा लाभांश आधीच जाहीर केला आहे. यामध्ये अनेक मोठ्या आणि लहान कंपन्या समाविष्ट आहेत ज्या वेगवेगळ्या प्रकारचे लाभांश देतील. कोणत्या कंपन्या दररोज किती लाभांश देत आहेत आणि गुंतवणूकदारांना याचा काय फायदा होऊ शकतो ते जाणून घेऊया.
२३ जून
लाभांश वितरणाची प्रक्रिया २३ जूनपासून सुरू होईल. या दिवशी दालमिया भारत लिमिटेड प्रति शेअर ५ रुपये, डायनॅमिक केबल्स लिमिटेड ०.५० रुपये, जीएन ए एक्सल्स लिमिटेड ३ रुपये, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड २४ रुपये, कान्साई नेरोलॅक पेंट्स लिमिटेड २.५० रुपये, कान्साई नेरोलॅक पेंट्स लिमिटेड १.२५ रुपये, कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड ९ रुपये, संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड ०.३५ रुपये, मदरसन सुमी वायरिंग इंडिया लिमिटेड ०.३५ रुपये आणि पिलानी इन्व्हेस्टमेंट अँड इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेड प्रति शेअर १५ रुपये अंतिम लाभांश देईल.
२४ जून
२४ जून रोजी अल्काइल अमाइन्स केमिकल्स लिमिटेड १० रुपये अंतिम लाभांश देईल. तर पॉलीकॅब इंडिया लिमिटेड ३५ रुपये आणि वेदांत लिमिटेड ७ रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश देणार आहे. लाभांशाची रेकॉर्ड तारीख २४ जून आहे.
२५ जून
२५ जून रोजी ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा लिमिटेड २० रुपये, एजिस लॉजिस्टिक्स लिमिटेड २ रुपये आणि क्वेस्ट कॅपिटल मार्केट्स लिमिटेड २.५० रुपये प्रति शेअर अंतिम लाभांश देणार आहे.
२६ जून
२६ जून रोजी, ENBEE ट्रेड अँड फायनान्स लिमिटेड ०.०१ रुपये आणि प्राइम सिक्युरिटीज लिमिटेड प्रति शेअर १.५० रुपये अंतिम लाभांश देईल.
२७ जून
या दिवशी अलाइड ब्लेंडर अँड डिस्टिलर लिमिटेड ३.६० रुपये अंतिम लाभांश देईल. याशिवाय अल्युफ्लोराइड लिमिटेड ३ रुपये, बजाज फिनसर्व्ह लिमिटेड १ रुपये, बजाज होल्डिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड २८ रुपये, भारत भूषण फायनान्स अँड कमोडिटी ब्रोकर्स लिमिटेड ०.६० रुपये, केअर रेटिंग्ज लिमिटेड ११ रुपये, सिप्ला लिमिटेड ३ रुपये, सिप्ला लिमिटेड १३ रुपये, एचडीएफसी बँक लिमिटेड २२ रुपये, जयंत अॅग्रो ऑरगॅनिक्स लिमिटेड २.५० रुपये, महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड ३० रुपये, महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड ३० रुपये आणि रेनबो चिल्ड्रन मेडिकेअर लिमिटेड ३ रुपये लाभांश देईल.
याशिवाय, आरपीजी लाईफ सायन्सेस लिमिटेड २० रुपये अंतिम लाभांश देईल, आरपीजी लाईफ सायन्सेस लिमिटेड ४ रुपये विशेष लाभांश देणार आहे. स्काय इंडस्ट्रीज लिमिटेड १ रुपये, लिमिटेड १०४.५० रुपये, सिंगानी इंटरनॅशनल लिमिटेड १.२५ रुपये, वैभव ग्लोबल लिमिटेड १.५० रुपये, विसाका इंडस्ट्रीज लिमिटेड ०.५० रुपये आणि वेल्सपन लिव्हिंग लिमिटेड प्रति शेअर १.७० रुपये अंतिम लाभांश देईल.