जवळार्जुन हायस्कुलमध्ये प्रात्याक्षिके
esakal June 23, 2025 01:45 AM

गराडे, ता२१ : जवळार्जुन हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसमवेत अतिशय उत्स्फूर्त पद्धतीने योगासन करण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योगासनाबाबतचे विचार तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचविण्याचा दृष्टिकोनातून सरपंच अजिंक्य अशोक टेकवडे यांनी जवळार्जुनमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला व योगासन देखील केले.
यावेळी प्रा. उत्तम निगडे, सोमनाथ राणे, जालिंदर टेकवडे, श्रीकांत राणे, बाप्पू राणे, विठ्ठल राणे, बाबूराव गायकवाड तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.