72320
शांताराम तर्फे यांचे निधन
कणकवली,ता. २२ ः जांभवडे बामणवाडी (ता.कुडाळ) येथील रहिवाशी, निवृत्त प्राथमिक मुख्याध्यापक, जांभवडे पंचक्रोशी शिक्षण समितीचे माजी खजिनदार शांताराम कृष्णा तर्फे (वय ९०) यांचे निधन झाले. प्राथमिक शिक्षक व नंतर मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना करारी बाणा, कणखर नेतृत्व, कडक शिस्त, अचूक निर्णय क्षमता, प्रामाणिकपणा, दानशूरपणा अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर अनेक यशस्वी विद्यार्थी घडवले. जांभवडे पंचक्रोशीतील ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलांना शिक्षण मिळायला हवे म्हणून ज्या लोकांनी माध्यमिक शाळा सुरू केली. त्यांच्याबरोबर तरुणपणात कार्यरत राहून सुमारे ४० वर्षे माध्यमिक पंचक्रोशी शिक्षण समितीचे सदस्य, संचालक, खजिनदार म्हणून काम केले. आपल्या कुटुंबासह इतरांचीही मुले शिकली पाहिजेत या उद्धेशाने शाळा उभारणीसाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी गावागावात फिरून, मुंबई सारख्या शहरात फिरून देणग्या गोळा करून शाळेच्या गरजा भागविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.