भारतीय समुदायाच्या सुरक्षित परतीसाठी आणि मायदेशी परतण्यासाठी सतत पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती पेझेश्कियान यांचे आभार मानले. व्यापार आणि आर्थिक सहकार्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि लोकांमधील संबंध यासह विविध क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यासाठी काम करत राहण्याची सामायिक वचनबद्धता दोन्ही नेत्यांनी पुन्हा व्यक्त केली. संपर्कात राहण्याचे त्यांनी मान्य केले: परराष्ट्र मंत्रालय
Akola News: अस्वलाचा दोन शेतकऱ्यांवर हल्लाबाळापूर तालुक्यातील टाकळी निमकर्दा येथील दोन शेतकऱ्यांवर अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती. या अस्वलाला पकडण्यासाठी अकोला वनविभागासोबत बुलढाणा येथील रॅपिड रेस्क्यू पथकाने संयुक्तपणे "फिजिकल रेस्क्यू" चे प्रयत्न केले.
वाइडबॉडी विमानांनंतर, एअर इंडिया आता नॅरोबॉडी उड्डाणे कमी करत आहेवाइडबॉडी विमानांनंतर, एअर इंडिया आता नॅरोबॉडी उड्डाणे कमी करत आहे.
'हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड' या पुस्तकाचे अनावरणकेंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी एएनआयचे अध्यक्ष प्रेम प्रकाश यांच्या 'हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड' या पुस्तकाचे अनावरण केले.
फुलंब्रीत शैक्षणिक जागरुकता आणि मार्गदर्शन शिबिर संपन्नशहरात रविवार 22 जुन रोजी समस्त मुस्लिम समाजा तर्फे शैक्षणिक जागरुकता व करीअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले, सदरील कार्यक्रम नगर पंचायत कार्यालय चे सभागृहात मुफ्ती अनिसुर्रहमान नदवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
Nashik News: सप्तशृंगी वणी गडावर भाविकांची भागवत एकादशी व सुट्टीमुळे मोठी गर्दीलाखो पावले टाळमृंदगांच्या गजर करीत आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरीच्या दिशेने जात असतांनाच संत ज्ञानोबारायंची अर्थात अवघ्या वारकऱ्यांची कुलस्वामिनी असलेल्या श्री सप्तशृंगी मातेच्या दरबारात आज भागवत एकादशी निमित्त श्री सप्तशृंगी मातेचा की जयचा जयघोष व पुंडलिक वरदा हरी विठ्ठल..."चा गजर करीत पावासाच्या सरी झेेलीत हजारो भाविक सप्तशृंगी मातेच्या भक्तीरसात चिंब होत नतमस्तक झाले.
Ashadhi Wari: निफाड येथे पायी दिंडीचे स्वागतनिफाड येथे वैनतेय विद्यालयाचे प्रांगणात श्रीक्षेत्र खेडगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर या श्री संत निवृत्तीनाथ आषाढी वारी पायी दिंडीचे मोठ्या भक्ती भावाने स्वागत करण्यात आले.
Kolhapur News: इचलकरंजीत शासनाच्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात रक्त तपासणी किटचा तुटवडाइचलकरंजीत शासनाच्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात गेल्या चार दिवसांपासून रक्त तपासणी किटचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक रुग्णांना नाइलाचजाने खासगी प्रयोगशाळांचा आधार घ्यावा लागत आहे. तर रक्त तपासणी न झाल्याने कांही रुग्णांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला आहे. दुसरीकडे औषधांचा साठा ही अपुरा असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. याचा थेट फटका रुग्णांना बसत असून रुग्णांचे नातेवाईक व कर्मचार्यांत वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. रुग्णालयाला औषधांसाठी वर्षाला किमान १ कोटीचा निधी आवश्यक आहे. प्रत्यक्षात १३ लाख इतकाच निधी मिळाला आहे.
Mumbai News: CST-कर्जत लोकलमध्ये धावत्या ट्रेनमध्ये राडा!घाटकोपर आणि मुलुंड दरम्यान धावत्या लोकलमध्ये तुंबळ हाणामारी
गर्दीत धक्का मारत शिवीगाळ करणाऱ्या तरुणांना प्रवाशांनीच दिला चोप
संतप्त प्रवाशांनी सिग्नलवर ट्रेन थांबताच तरुणांना डब्यातून उतरवलं
मुंबई लोकलमध्ये पुन्हा एकदा प्रवाशांचा संयम सुटल्याचा थरकाप
Live: इराणमधून ३११ भारतीयांची सुखरूप सुटका, ऑपरेशन सिंधू अंतर्गत मोठी कामगिरीऑपरेशन सिंधू अंतर्गत भारतीयांची सुखरूप सुटका सुरूच
२२ जून रोजी संध्याकाळी ४.३० वाजता मशहादहून निघालेल्या विशेष विमानातून ३११ भारतीय नागरिक नवी दिल्लीत दाखल.
आतापर्यंत १४२८ भारतीय नागरिकांना इराणमधून बाहेर काढण्यात आले
Solapur Live: मातंग समाज कृती समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळामातंग समाज कृती समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिवसाचे औचित्य साधून इयत्ता १० वी, इयत्ता १२ वी व तत्सम परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ गुरूवारी (ता.२६) सायंकाळी ५ वाजता रंगभवन येथील समाजकल्याण केंद्र येथे आयोजित करण्यात आला आहे.
भाजपमध्ये जाणार नाही, एकनाथ खडसे यांचा पुनरूच्चारमी भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपमध्ये परत जाण्याच्या चर्चेला मी पूर्णविराम दिला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये समाधानी आहे, असं विधान माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी केले आहे.
एकनाथ खडसे आज विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपमध्ये जाणार नसल्याचा पुनरुच्चार केला.
मी मंत्री असताना गिरीश महाजन हा माझा कार्यकर्ता होतो. मी मंत्री मंडळातून बाहेर पडल्यानंतर गिरीष महाजन यांना मंत्री मंडळात स्थान मिळाले. आमच्या जिल्ह्याला त्यांच्या निमित्ताने प्रतिनिधित्व मिळाले ही चांगली बाब आहे.
Kolhapur Live: राऊतवाडी धबधब्यात पाण्याच्या प्रवाहातून वाहून जाणारा तरुण थोडक्यात बचावलाराऊतवाडी धबधब्यात पाण्याच्या प्रवाहातून वाहून जाणारा तरुण थोडक्यात बचावला.
धबधब्याच्या ठिकाणी इतर पर्यटकांनी तरुणाला वाचवले.
धबधब्याच्या ठिकाणी सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून प्रवाहातून गेला होता वाहून.
राधानगरी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने धबधब्याचा प्रवाह सुद्धा वाढला.
तेजस्विनी घोसाळकर यांनी घेतली मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची भेट
मुंबई बँकेच्या संचालक पदी निवड झाल्यानंतर तेजस्विनी घोसाळकर यांनी प्रथमच घेतली उद्धव ठाकरे यांची भेट
तेजस्विनी घोसाळकर यांनी काही दिवसापूर्वी शिवसेना विभागीय पदाचा दिला होता राजीनामा
Bhiwandi Live : आमदारांनी भरले भिवंडी-वाडा मार्गावरील खड्डेभिवंडी-वाडा महामार्गाच्या नादुरुस्त अवस्थेवर श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ते प्रमोद पवार यांनी नुकताच प्रसारित केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडिओमुळे जनतेच्या भावनांना वाट मिळाली आणि प्रशासनाला जाग येऊन आज तातडीने कारवाई सुरू झाली. त्यात शिवसेना नेते प्रकाशजी पाटील यांनी शनिवारी रात्रीच प्रमोद पवार यांच्याशी संपर्क साधून या प्रश्नावर चर्चा केली. त्यानंतर रविवारी सकाळी शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत आमदार शांतारामजी मोरे, प्रमोद पवार यांनी हातात फावडा घमेला घेऊन भरले रस्त्यातील खड्डे.
Jalgaon Live: मुक्ताईनगर शहरात अवजड वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरमुक्ताईनगर शहरात अवजड वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अनेकदा विरोध होऊनही पोलीस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. विशेषतः आज एकादशी असून, मुक्ताईनगरमध्ये हजारो वारकरी जमा झाले असतानाही मुख्य रस्त्यावर वाहतूक नियंत्रणासाठी एकही पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी उपस्थित नसल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
Ambarnath Live : अंबरनाथमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, जुगार अड्ड्यावर छापाअंबरनाथमध्ये पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा घातला आहे. 11 पुरुष आणि 2 महिलांना त्यांनी यावेळी ताब्यात घेतलं आहे. कोहोजगावच्या पटेल प्रेस्टिज इमारतीत हा अड्डा सुरु होता.
Nashik Live : नाशिक विमानतळाच्या विकासाबाबत भुजबळांचा महत्वाचा निर्णयजिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी आपण कटिबद्ध असून उद्योगांना आवश्यक त्या सर्व सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा), अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) व इतर औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच भुजबळ यांची भेट घेतली. या वेळी त्यांचा सत्कार करण्यात आला आणि जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासंबंधी विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली.
Nanded Live : अभियांत्रिकी महाविद्यालयाने केली दीड लाख वृक्षबिजांची जैविक पद्धतीने लागवडनांदेड येथील श्री गुरुगोविंद सिंगजी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत कंधार तालुक्यातील चिखली गावातील परिसरात व रस्त्याच्या दुतर्फा सुमारे दीड लाख वृक्षबिजांची जैविक पद्धतीने लागवड केली आहे, यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
Mumbai Live : मुंबईच्या घाटकोपर विभागातील ऑर्किड टॉवर नंबर सहा मध्ये भीषण आगघाटकोपरमधील ऑर्किड परिसरातील टॉवर क्रमांक ६ मधील चौथ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये भीषण आग लागली.
आग लागल्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या चारहून अधिक गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.
दरम्यान, मुंबई पोलीस दलही घटनास्थळी उपस्थित असून मदत- बचाव कार्य सुरू आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीच्या पात्रात पाण्याची मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने २३ गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून, नागरिकांनी नदीपात्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तापी नदी क्षेत्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे जलपातळीमध्ये वाढ झाली आहे. यामुळे प्रकाश बॅरेजचे दोन दरवाजे तब्बल २.५ मीटरने उघडण्यात आले असून, नदीपात्रात जोरदार पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे.
हिंदी भाषा सक्ती संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीसहिंदी भाषा सक्ती संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुंभमेळ्याच्या अनुषंगाने बैठक घेणारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुंभमेळ्याच्या अनुषंगाने बैठक घेणार असल्याची माहिती समोर आली आहे
Live Update: कारगिलमध्ये शौर्यामुळे प्राण गमावलेल्या सर्व सैनिकांना मी श्रद्धांजली अर्पण करतो- एकनाथ शिंदेमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "कारगिल विजय दिनानिमित्त सरहद शौर्यथॉन २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. या शौर्यथॉनमध्ये सहभागी झालेल्या सर्व धावपटूंचे मी अभिनंदन करतो आणि यासोबतच, कारगिलमध्ये शौर्यामुळे प्राण गमावलेल्या सर्व सैनिकांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, कारगिल भारताचा एक भाग आहे आणि आपण येथे बसलो आहोत... गेल्या ८ वर्षांपासून सैन्याकडून सरहद शौर्यथॉनचे आयोजन केले जात आहे. महाराष्ट्र सरकारने लेसर लाईट आणि साउंड शोसाठी कारगिल युद्ध स्मारकाला ३ कोटी रुपये दिले आहेत, ज्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल...
Amarnathyatra Live Update: लष्करप्रमुखांचा काश्मीर दौरा, अमरनाथ यात्रेपूर्वी सुरक्षा तयारीचा आढावाजनरल उपेंद्र द्विवेदी यांनी काश्मीरमधील सुरक्षा ग्रिडचा आढावा घेतला आणि अमरनाथ यात्रा २०२५ संदर्भातील ऑपरेशनल तयारीचे मूल्यांकन केले.
बारामती - माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत असून आज मतदान सुरू आहे. सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख चंद्रराव तावरे मतदानासाठी मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत. ८५ वर्षीय चंद्रराव तावरे हे चेअरमन पदाचे दावेदार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात तावरेंचा पॅनल आहे.
Pune : पुण्यात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे यशस्विनी सन्मान सोहळापुण्यात यशंवतराव चव्हाण प्रतिष्ठान आयोजित यशस्विनी सन्मान सोहळ्यात शरद पवार उपस्थित राहिले आहेत. राज्यभरात विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान होणार आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.
Ashadhi Wari : संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसरमध्ये पोहोचलीआषाढी वारी सुरू असून संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसरमध्ये पोहचली आहे. पुणे शहरातून मार्गस्थ झाल्यानंतर तुकोबांची पालखी हडपसर मध्ये दाखल होताच नागरिकांनी पालखीचं स्वागत केलं. पालखीचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी उसळली आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज मुक्काम लोणी काळभोरमध्ये असणार आहे.
Sanjay Raut Live : उद्वव आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ निर्णय घेतील- संजय राऊतयुतीबाबत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे गोधे भाऊ निर्णय घेतील, त्यामुळे कुणाच्या म्हणण्याला काही अर्थ नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Pune Live : पुण्यातील सिंहगड उड्डाणपुलाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम रखडले,अजून एक महिना लागणारसिंहगड रस्त्यावरील तिसऱ्या टप्प्यातील उड्डाणपूल १५ जून रोजी वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले होते. पण मे व जून महिन्यात झालेल्या जोरदार पावसानंतर या कामाचे नियोजन बिघडले आहे.
Sandip Deshpande Live : बॅनरबाजी केल्यामुळे युती होऊ शकत नाही : संदीप देशपांडेमनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या युतीच्या चर्चा सुरु असतानाच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दोन्ही मोठे निर्णय घेतील, बॅनरबाजी केल्याने युती होऊ शकत नाही, असे म्हटले आहे.
Pune Live : संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दिवेघाटाकडे प्रस्थानसंत ज्ञानेश्वर महाराजांचा पुण्यात मुक्कामानंतर आज सकाळी दिवेघाटाचा दिशेन प्रस्थान झाले.
Pune Live : माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी केले मतदानमाळेगाव सहकारी कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठीआज मतदान होत असून अध्यपदासाठी उमेदवार असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी मतदान केले. खासदार सुप्रिया सुळे यांनीही मतदान केले. अजित पवार यांच्यासमोर शरद पवार गट आणि चंद्रराव तावरे गटाचे आव्हान आहे.