Solapur News : खासदार प्रणिती शिंदे रेल्वेच्या बैठकीला गैरहजर; मोहिते-पाटील, ओमराजेंसह इतर उपस्थित
esakal June 24, 2025 04:45 PM

सोलापूर : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक व मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुणे येथे पुणे व सोलापूर विभागातील खासदारांसोबत (सोमवारी ता. २३) बैठक घेतली. या बैठकीला खासदार प्रणिती शिंदे यांची अनुपस्थिती होती. खासदार प्रणिती शिंदे यांना वगळता सोलापूर विभागातील इतर सर्व खासदार उपस्थित होते.

Success Story: 'अंगणवाडी सेविका ५४ व्या वर्षी दहावी उत्तीर्ण'; गोरेवाडीच्या इंदिरा घाडगेंची जिद्द, इच्छाशक्ती प्रबळ

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरम वीर मीणा, प्रधान विभाग प्रमुख तसेच पुणे व सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. २३) पुणे येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातील हॉलमध्ये पुणे व सोलापूर विभागातील खासदारांसोबत बैठक झाली.

या बैठकीस माननीय खासदार सुप्रिया सुळे (बारामती), श्रीरंग बारणे (मावळ), ओमप्रकाश राजेनिंबाळकर (धाराशिव), धैर्यशील मोहिते-पाटील (माढा), डॉ. अमोल कोल्हे (शिरूर), भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी), नीलेश लंके (अहिल्यानगर), विशाल पाटील (सांगली), रजनी पाटील (राज्यसभा, बीड), नितीन जाधव-पाटील, शिवाजी काळगे, माया नारोलिया (होशंगाबाद) मेधा कुलकर्णी (राज्यसभा, पुणे) यांनी उपस्थिती दर्शविली. या बैठकीत खासदार सुळे यांनी या समितीच्या अध्यक्षा म्हणून काम पाहिले.

माेठी बातमी! 'तुळजापूरच्या माजी नगराध्यक्षाला ड्रग्सप्रकरणी अटक'; आतापर्यंत २२ संशयितांना अटक, १३ संशयित अद्याप फरार

मी ओडिसा दौऱ्यावर आहे. येथे महिलांवरील अत्याचारात वाढ झालेली आहे. त्यासंदर्भात दौरा आहे. यामुळे बैठकीला नव्हते. माझ्या वतीने प्रतिनिधीला पाठविले होते.

- प्रणिती शिंदे, खासदार, सोलापूर

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.