अरुना इराणी फिटनेस सेक्रेटरी
Marathi June 24, 2025 09:25 PM

हिंदी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अरुणा ईरानी यांनी ‘बॉम्बे टू गोवा’, ‘कारवाँ’, ‘बेटा’, ‘दिल तो पागल है’सारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. वयाच्या 80 व्या वर्षीही त्या अत्यंत फिट आहेत. दोन वेळा कॅन्सर, दोन्ही किडनी फेल असूनही अरुणा पूर्णपणे तंदुरुस्त दिसतात. (Bollywood Actress Aruna Irani Fitness Secret)

एका मुलाखतीत त्यांनी आपल्या फिटनेसबाबत काही गोष्टी सांगितल्या होत्या. ज्यानुसार त्यांना एकदा नव्हे तर दोनदा ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. इतकंच काय तर त्यांच्या दोन्ही किडन्या बंद झाल्या आणि तरीही त्यांनी ना कीमोथेरपी घेतली ना डायलिसिस. असे असूनही आज त्या अगदी उत्तम आयुष्य जगत आहेत. यासाठी त्यांनी जीवनशैलीत काही महत्वाचे नियम पाळले आहेत. ते कोणते हे पाहुयात.

1) दृष्टिकोन

मुलाखतीत बोलताना अरुणा इराणी म्हणाल्या, ‘मला दोनदा ब्रेस्ट कॅन्सर झाला. पहिली गाठ सापडल्यावर डॉक्टरांनी ती तातडीने काढून टाकली आणि कीमोथेरपी न करता मी पुढे जगले. दुसऱ्यांदा कोविडमध्ये मला पुन्हा कॅन्सर झाला. तेव्हा मी रेडिएशन थेरपी घेतली. आजारपणाबाबत एक स्पष्ट आहे आणि ते म्हणजे, आजारी पडलो तरी घाबरायचं नाही. लक्षात आलं की उपचार करा आणि पुढे चला. हा दृष्टिकोन शारीरिकसोबत मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो’.

2) नियमित एक तास वॉक

अरुण इराणींचा एकही दिवस वॉकशिवाय पूर्ण होत नाही. कुठेही आणि कितीही कामात असल्या तरी दररोज सकाळी त्या एक तास चालतात. कारण चालणं आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवासाठी एक नैसर्गिक औषध आहे. यासह योगा, ध्यान आणि प्राणायामदेखील त्यांच्या दिनचर्येचा महत्वाचा भाग आहेत.

3) 'रात्रीचे जेवण नाही'

अरुणा इराणी रात्रीचं जेवण करत नाहीत. त्याऐवजी त्या दिवसभरात थोडं थोडं खातात. त्यांच्या आहारात पाणी, फळं आणि हिरव्या भाज्यांचा समावेश असतो. दुपारच्या वेळी त्या भरपेट जेवतात. तर रात्री फक्त दुधी भोपळ्याचा रस, ताक किंवा थोडं दूध घेतात.

4) नियमितपणा

अरुणा इराणी सांगतात की, शिस्तबद्ध जीवनशैली आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली ठरू शकते. त्यामुळे शरीराच्या सिग्नल्सकडे दुर्लक्ष करू नका. तसेच व्यायाम, उत्तम आहार आणि भरपूर पाणी पिण्यासारख्या चांगल्या सवयींमध्ये नियमितता ठेवा. केवळ या नियमाचे पालन केल्यास तुमचं वय काहीही असो आजारपण येणार नाही, असे अरुणा इराणी सांगतात.

हेही वाचा –

Lakshmi Niwas :भावना-सिद्धूचे लग्न, गाडे पाटलांच्या घरात नवा अध्याय सुरू

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.