मुरबाड (बातमीदार)ः आय.के.एस. केअर्स फाउंडेशन व सर्वस्वी सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने टाकीचीवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील २५० विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन, रक्तगट तपासणी व सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली. मानिवली (शि.)अंतर्गत येणाऱ्या ठाणे जिल्हा परिषदेच्या टाकीची वाडी, तळ्याची वाडी, देवराळवाडी, मानिवली व वेहेरे येथील प्राथमिक शाळेमधील बहुसंख्य विद्यार्थी आदिवासी समाजाचे आहेत. या पाच शाळांमधील विद्यार्थ्यांचे हिमोग्लोबिन, रक्तगट तपासणी व सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली. या वेळी मोफत औषध वाटप केल्याचे सर्वस्वी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सागर कडव यांनी सांगितले.