Prada Fashion Ramp: प्राडाच्या फॅशन रॅम्पवर कोल्हापुरी चप्पलचा जलवा! पण भारताला दिलं नाही श्रेय; सोशल मीडियावर नेटिझन्स पेटले
esakal June 25, 2025 05:45 AM

Prada Fashion Ramp: इटलीतील मिलान येथील प्राडा स्प्रिंग फॅशन शो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. यामागचे कारण म्हणजे प्राडाने आपल्या सादरीकरणात जगप्रसिद्ध कोल्हापुरी चप्पलसारखी दिसणाऱ्या सँडलचा समावेश केला. मॉडेल्सकडून सादर केलेली चप्पल ही कोल्हापुरी चप्पलेसारखीच असली तरी प्राडाने भारतीय कारागिरांना कोणतेही श्रेय दिले नाही. प्राडाने भारताच्या नावाचा उल्लेख का केला नाही, याबद्दल नाराजी पसरली आहे.

X.com : एलॉन मस्क नवीन सोशल मीडिया साइट काढण्याच्या तयारीत? काय आहे प्रकरण

रॅम्पवॉकमध्ये मॉडेल्सच्या पायात दिसणारी चप्पल ही कोल्हापुरी चप्पलेचीच नक्कल असताना प्राडाकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू असून आंतरराष्ट्रीय फॅशन ब्रँड भारताला श्रेय कधी देतील? असा सवाल नेटिझन्स करत आहेत.

एक्सवर एका यूजरने म्हटले, की प्राडा एसएस२६ मध्ये कोल्हापुरी चप्पलेचे सादरीकरण करण्यात आले असून ती मुळची भारतातील राज्य महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरातील कारागिरांची निर्मिती आहे. स्कॅन्डिनेव्हियन स्कार्फप्रमाणेच परदेशातील फॅशन उद्योग हा पुन्हा एकदा भारतीय फॅशनची चोरी करत आहे, असे नेटिझन्सने म्हटले आहे. प्राडा आता शेकडो डॉलरमध्ये कोल्हापुरी चप्पलची विक्री करत असताना ही कलाकृती जीवंत ठेवणाऱ्या कारागिरांना कोणतेही श्रेय मिळत नाही आणि मानधनही नाही, अशी टिपणी अन्य एका नेटिझन्सने केली आहे.

Mumbra Train Incident: लोकलमधून पडलेल्या प्रवाशांच्या दुर्घटनेचा चौकशी अहवाल आला समोर; धक्कादायक निष्कर्ष

स्कॅडिनेव्हियन स्कार्फ आणि अन्य लाखो गोष्टीनंतर आता जगातील आमची सर्वात लाडकी कोल्हापुरी चप्पलेची खुलेआम चोरी केली आहे, अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे. हा प्राडाचा पुरुषांचा वसंत संकलन २०२६ असून ते या चप्पलेला काय म्हणतील? याबाबत उत्सुक आहे. हस्तनिर्मित चामड्याची थोंग चप्पल? कोल्हापुरी चप्पलेला कोणतेही जिओ टॅगिंग नाही का? ते आपला वारसा चोरू शकतात आणि ते वेडे कोणत्याही किमतीवर विक्री करू शकतात? अशा शब्दांत अन्य एकाने नाराजी व्यक्त केली. प्राडाच्या सिझनमध्ये कोल्हापुरी चप्पलेचे मूळ भारतात असतानाही या कार्यक्रमात कोल्हापुरी वारशाचा, भारताच्या संदर्भाचा दाखला दिला नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.