धाब्यावर जेवणासाठी गेलेल्या पाच मित्रांच्या कारचा छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात झाला आहे. शहरतील सिल्लोड रोडवर मंगळवार (24 जून) मध्यरात्रीच्या सुमारास घटना घडलीय. हा अपघात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी आहेत.
माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी दुसऱ्या दिवशीही सुरूबारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतमोजमी पहिली फेरी मंगवारवारी रात्री पूर्ण झाली. तर, दुसऱ्या फेरीची मतमोजणी आज (बुधवार) सकाळी पहाटे पाचपासून सुरू झाली आहे. दुपारी 12 च्या दरम्यान निकाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्या फेरीत अजित पवारांचे 17 उमेदवार आघाडीवर आहेत. तर, रंजन तावरे यांचे चार उमेदवार आघाडीवर आहेत.