छोट्या कार्गो मोबॅलिटीमध्ये नवं युग, टाटा मोटर्सकडून ऑल न्यू टाटा ऐस प्रो लॉन्च
GH News June 25, 2025 07:11 PM

भारतातील सर्वात मोठी वाहन निर्माती कंपनी टाटा मोटर्सने छोट्या कार्गो मोबॅलिटीमध्ये क्रांती आणण्यासाठी ऑल न्यू टाटा ऐस प्रो लॉन्च केला आहे. अवघ्या 3.99 लाख रुपयाला मिळणारा हा भारतातील सर्वात स्वस्त फोर व्हिल मिनी ट्रक आहे. अत्यंच चांगली एफिशियन्सी, जबरदस्त मल्टी फ्यूलचे पर्यात आणि जबरदस्त व्हॅल्यूसह हा मिनी ट्रक विक्रीला आहे.

नव्या उद्योजकांना आशेचा किरण

टाटा ऐस प्रोला पेट्रोल, बाय फ्यूल (CNG + पेट्रोल) आणि इलेक्ट्रिकल व्हेरिएंट्सह बाजारात आणलं आहे. त्यामुळे ग्राहत आपल्या व्यावसायिक गरजेनुसार पर्याय निवडू शकणार आहेत. ग्राहक टाटा मोटर्सचे 1250+ कमर्शिअल व्हेईकल सेल्स टचपॉइंट्सवर वा Fleet Verse ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर जाऊन आपल्या पसंतीचे व्हेरिएंट बुक करू शकतात. त्याशिवाय टाटा मोटर्सने प्रमुख बँका आणि NBFCs सोबत भागिदारी करून सोपी फायनान्सिंग सोल्यूशन्स जसे की, कर्ज मंजुरी, किफायतशीर ईएमआय पर्याय आणि चांगला फंडिंग सपोर्टही उपलब्ध करून दिला आहे.

टाटा मोटर्सच्या दिग्गजांचं म्हणणं काय?

टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ म्हणाले की, टाटा ऐस लॉन्चिंगने भारतात कार्गो मोबॅलिटीला नवीन दिशा दिली आहे. गेल्या दोन दशकात 25 लाखाहून अधिक उद्योजकांना सशक्त बनवून विकास आणि संधीचं तो प्रतिक बनला आहे. नवीन टाटा ऐस प्रो हा वारसा पुढे नेतानाच आजच्या युवकांच्या स्वप्नांना साकार करण्याचं माध्यम बनेल, असं गिरीश वाघ यांनी म्हटलं आहे.

तर, टाटा ऐस प्रोला गहन ग्राहक अनुसंधान आणि व्यापक परीक्षणांच्यासह तयार करण्यात आलं आहे. मल्टी फ्यूल ऑप्शन, किफायतशीर मूल्य आणि शानदार ड्रायव्हॅबिलिटी याला प्रत्येक उद्योगासाठी उपयुक्त बनवत आहे, असं SCVPU, टाटा मोटर्स कमर्शियल व्हेइकल्सचे व्हाइस प्रेसिडेंट आणि बिझनेस हेड पिनाकी हवालदार यांनी सांगितलं.

750 किलोंची पेलोड क्षमता

टाटा ऐस प्रोमध्ये 750 किलोग्रॅमची पेलोड क्षमता आहे. यात 6.5 फूट (1.98 मीटर) मल्टी-कन्व्हर्टेबल डेक मिळते. हाफ-डेक किंवा फ्लॅटबेड साठी फॅक्टरी-फिटेड लोड बॉडीचा ऑप्शन मिळतो. टाटाचा हा मिनी ट्रक कंटेनर, म्युनिसिपल सेवा आणि इतर कामांसाठी वापरला जाऊ शकतो. यामध्ये असणारे चेसिस आणि मजबूत बांधणी जड मालाची वाहतूक करण्यासाठी सक्षम बनवते.

3 पॉवरट्रेन पर्याय

टाटा ऐस प्रो मिनी ट्रक तीन पॉवरट्रेन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यात पेट्रोल, बाय-फ्यूल (सीएनजी+पेट्रोल) आणि इलेक्ट्रिक असे पर्याय उपलब्ध आहेत. पेट्रोल प्रकारात 694 सीसी इंजिन जे 30 बीएचपी पॉवर आणि 55 एनएम टॉर्क जनरेट करते. इलेक्ट्रिक व्हेरिएंट एका चार्जवर 38 बीएचपी पॉवर, 104 एनएम टॉर्क आणि 155 किमीची रेंज देते. यात आयपी 67 रेटेड बॅटरी आणि मोटरमुळे ही मिनी ट्रक सर्व हवामानात चालते.

बाय-फ्युएल व्हेरिएंटमध्ये सीएनजीमुळे खर्चात बचत होते. यात 5 लिटर पेट्रोल बॅकअप टँक मिळते. सीएनजी मोडमध्ये हे 26 बीएचपी पॉवर आणि 51 एनएम टॉर्क जनरेट करते.

आरामदायी केबिन

लांब पल्ल्याच्या ड्रायव्हिंगसाठी टाटा एस प्रोमध्ये एर्गोनॉमिक सीटिंग, मोठे स्टोरेज आणि आधुनिक सुविधांसह सुसज्ज असे केबिन आहे. हे केबिन AIS096 मानकांनुसार क्रॅश-टेस्टेड आहे. यात डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इन्फोटेनमेंट सिस्टम देखील मिळते.

स्मार्ट कनेक्टिव्हिटी आणि ड्रायव्हर असिस्टन्स

टाटा मोटर्सचे कनेक्टेड व्हेईकल प्लॅटफॉर्म फ्लीट एज टाटा एस प्रोला आणखी स्मार्ट बनवते. यामुळे वाहनाची स्थिती, चालकाची वर्तणूक आणि भविष्यातील सर्व्हिसिंगबाबत माहिती मिळते. ज्यामुळे चालकाला मिनी ट्रकबाबत वेळोवेळी अपडेट मिळत राहते. गियर शिफ्ट अॅडव्हायजर आणि रिव्हर्स पार्किंग असिस्टमुळे चालकाला मोठी मदत होते.

टाटाकडून देशभरात सेवा मिळते

टाटा कंपनीची देशभरात 2500 पेक्षा जास्त सर्व्हिस आणि स्पेअर्स आउटलेट्स आहेत. त्यामुळे तुम्हाला देशाच्या कानाकोपऱ्यात कंपनीकडून सेवा मिळते. तसेच इलेक्ट्रिक वाहनांसाठी कंपनी 24×7 रोडसाईड असिस्टन्स सेवा देते. याचा वाहनचालकांना फायदा होतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.