काँग्रेसच्या माजी आमदारावर मनी लाँड्रिंगचा आरोप, ईडीने जप्त केली ६३८ कोटींची मालमत्ता
esakal June 29, 2025 12:45 PM

ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेसच्या माजी आमदाराची ५५७ कोटींची मालमत्ता जप्त केलीय. नेत्याच्या कंपन्यांशी संबंधित ही मालमत्ता आहे. या कारवाईसह आतापर्यंत आमदाराची एकूण ६३८ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आलीय. धर्म सिंह छोकर असं माजी आमदाराचं नाव आहे.

जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये गुरुग्राममधील ३५ एकर जमीन, रहिवाशी आणि व्यावसायिक मालमत्तांचा समावेश आहे. हे प्रकरण महिरा इन्फ्राटेक लिमिटेडशी संबंधित आहे. याआधी ही कंपनी साई आईना फार्म्स प्रायव्हेट लिमिटेड नावाने ओळखली जात होती.

Utility News : युपीआय पेमेंटपासून ते रेल्वेच्या तात्काळ तिकिटापर्यंत... १ जुलै पासून बदलणार 'हे' नियम

आरोपींनी बनावट कागदपत्रं आणि खोट्या बँक गॅरंटीच्या माध्यमातून गुरुग्राममध्ये स्वस्त गृह प्रकल्पासाठी परवाना मिळवला. या प्रकल्पाच्या नावावर ३७०० लोकांकडून ६१६ कोटी वसूल केले. यानंतर कंपनीने वेळेत ग्राहकांना घर दिलं नाही आणि पैशांचा अपहार केला.

ईडीने कंपनीच्या संचालकांसह इतरांची चौकशी केली. त्यात संचालक आणि प्रमोटर्सनी खोटा खर्च दाखवून त्यांच्याच सहकारी कंपन्यांना पैसे पाठवले. याशिवाय खरेदीदारांकडून गोळा केलेले पैसे इतर कंपन्यांना कर्ज म्हणून दिले. जे गेल्या काही वर्षांपासून थकीत आहे.

ईडीने गुरुग्रामच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं असून न्यायालयाने याची दखल घेतलीय. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ८१ कोटींची मालमत्ता जप्त केली होती. महिला ग्रुपचे प्रमोटर सिकंदर सिंह यांना ३० एप्रिलला अटक केली होती. छोकर यांना ५ मे रोजी ताब्यात घेतलं होतं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.