Pune : लग्नात २५ लाख खर्च, नंतरही ५० लाख दिले तरी विवाहितेचा छळ; गलरीतून ढकलून हत्येचा प्रयत्न, पतीसह ६ जण फरार
esakal June 30, 2025 04:45 PM

पुण्यात आणखी एक हुंड्यासाठी खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सासरच्या मंडळींनी ५० लाखांची मदत दिली तरी विवाहितेवर अत्याचार करण्यात आला. तिला गॅलरीतून ढकलून देत खूनाचा प्रयत्न केला गेला. या प्रकरणी वडगाव शेरीतल्या सिलिकॉन बे सोसायटीतील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, विवाहितेनं पोलिसात तक्रार दिली असून आरोपी फरार झाले आहेत. पती प्रणील निकुडे, सासरे उधय निकुडे, सासू वैशाली निकुडे, दीर प्रतीक निकुडे, चुलत सासरे माणिक निकुडे, चुलत दीर प्रमोद निकुडे यांच्याविरोधात विवाहितेनं तक्रार दाखल केलीय. आऱोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

१८ एकर जमीन.., व्हिडीओ पाहून ४५ वर्षीय शिक्षकाला कॉल; शाहिदाने खुशी बनून लग्न केलं, दुसऱ्याच दिवशी त्याला संपवलं

२४ वर्षीय तरुणीचा एप्रिल २०२३ मध्ये विवाह झाला. त्यावेळी वडिलांनी २५ लाखांचा खर्च केला. रोख रक्कम, दागिने आणि इतर वस्तूही दिल्या. पण लग्नानंतर काही महिन्यातच सासरच्या मंडळींनी छळ करायला सुरुवात केली. वडिलांनी नातेवाईकांकडून पैसे घेत लेकीच्या सासरच्यांना जवळपास ५० लाखांची मदत केली. तरीही तिचा छळ सुरूच होता.

पतीने २७ मे रोजी तिची गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला. तर २५ जूनला मोमोजच्या ऑर्डरवरून दोघांमध्ये वाद झाला. तेव्हा पतीनं तिचं डोकं कपाटावर आपटलं आणि केसही ओढले. तिचा फोन फोडून गॅलरीत ओढत नेलं आणि ढकलण्याचा प्रयत्न केला.

पतीकडून मारहाणीवेळी विवाहितेनं आरडाओरडा केला. त्यामुळे सोसायटीतील वॉचमन आणि काही रहिवाशांनी आवाज दिल्यानं तिचे प्राण वाचले. वॉचमनने महिलेच्या वडिलांना बोलावलं. तिचे वडील मध्यरात्री येऊन तिला घेऊन गेले. तर निकुडे कुटुंब या घटनेनंतर फरार झाले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.